भाजपचा पदाधिकारी असलेल्या आरोपी कुलकर्णीला पोलिसांनी अक्षरक्षः पळवत नेले

भाजपचा पदाधिकारी असलेल्या आरोपी कुलकर्णीला पोलिसांनी अक्षरक्षः पळवत नेले

कल्याण :  बेकायदा शस्त्रसाठ्याप्रकरणी अटकेत असलेला डोंबिवलीतील भाजपचा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी याला  पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर कुलकर्णीची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली आहे. त्यामुळे कुलकर्णीच्या जामिनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे पोलीसांकडून  कोणताही युक्तिवाद केला गेला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मागील सुनावणीत कुलकर्णी याला कोर्टात कधी हजर करून सुनावणी झाली याचा थांगपत्ता पोलिसांनी माध्यमांना लागू दिला नाही. यामुळे मंगळवारी सकाळपासून माध्यमांनी कोर्ट परीसरात हजेरी लावली होती. यावेळी माध्यमांना चकवा देऊन पोलीस कुलकर्णी ला घेऊन सुनावणी साठी हजर झाले.सुनावणी झाल्यानंतरही कुलकर्णीला मिडियापासून वाचवण्यासाठी पोलीस त्याला घेऊन अक्षरशः पळुन गेले. 

धनंजय कुलकर्णी यांच्या डोंबिवलीतील तपस्या हाऊस ऑफ फॅशन नावाच्या दुकानात प्राणघातक शस्त्र सापडली होती. कल्याण न्यायालयाने या प्रकरणी  त्याला थेट न्यायालयीन कोठडी सुनावल्याने सर्वांच्या भुवया उंच झाल्या होत्या. माध्यमांच्या दबावामुळे पोलिसांनी कुलकर्णीच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही मुदत संपल्यामुळे मंगळवारी पुन्हा  त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते.  यावेळी पोलिसांकडून कोणताही युक्तिवाद न करण्यात आल्याने कुलकर्णीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे एकप्रकारे कुलकर्णीच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

कुलकर्णीने आपल्या वकिलाच्या माध्यमातून जामीनाचा अर्ज दाखल केला असून यावर बुधवारी सुनावणी होणार आहे. तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत कुलकर्णी याने कोणतेही सहकार्य केले नसल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे  या सुनावणीच्या वेळी काही भाजप  पदाधिकारीही कोर्टात हजर होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com