राज ठाकरे इफेक्ट; ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या जामीन रकमेत घट

ठाणे स्थानकातील फेरीवाल्यांना मारहाण करून हुसकावणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांना दोनदा अटक करून तसेच शहराध्यक्ष अविनाश जाधव यास एक कोटी तर पदाधिकाऱ्यांना 25 लाखांचे जामीन आणण्याचे आदेश देऊन पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना अडचणीत आणले होते.
राज ठाकरे इफेक्ट; ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या जामीन रकमेत घट

ठाणे : ठाणे स्थानकातील फेरीवाल्यांना मारहाण करून हुसकावणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांना दोनदा अटक करून तसेच शहराध्यक्ष अविनाश जाधव यास एक कोटी तर पदाधिकाऱ्यांना 25 लाखांचे जामीन आणण्याचे आदेश देऊन पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना अडचणीत आणले होते. 

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन जामिनाची रक्कम ऐपतीप्रमाणे कमी करण्याची विनंती केली होती. त्या अनुशंगाने आता या कार्यकर्त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा जामीन देण्याचे आदेश नौपाडा विभागाचे सहाय्यक पोलीस आय़ुक्त अभय सायगावकर यांनी बजावली आहे. 

या प्रकरणावरून राज ठाकरे यांनी पोलिस आयुक्तांवर टीकास्त्र सोडले होते. परंतु जामीन रक्कम कमी झाल्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. हा जामीनही भरणार नसल्याचा दावा सुरू करण्यात आला आहे.  

ठाणे रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांविरोधात मनसे पदाधिकाऱ्यांना धडक कारवाई करत या भागातील फेरीवाल्यांना मारहण करून हुसकावून लावले होते. या प्रकारानंतर मनसेच्या सात ते आठ पदाधिकाऱ्यांविरोधात नौपाडा पोलीस ठाणे आणि ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या दोन्ही पोलिस ठाण्यांतील पोलीसांनी आळीपाळीने मनसेच्या पदाधिकाऱ्यांना अटक करून त्यांच्या कोठडीमध्ये वाढ केली होता. यामध्ये मनसे पदाधिकारी तीन ते चार दिवस पोलीस कोठडीमध्ये अडकून पडले होते. त्यानंतर जामीनांवर सुटलेल्या या पदाधिकाऱ्यांवर थेट क्रिमिनल प्रोसीजर कोडच्या कलमान्वेय (चाप्टर केस) कारवाई सुरू केली आहे. त्या अन्वेय बजावलेल्या नोटीसांमध्ये शहराध्यक्ष अविनाश जाधव यास एक कोटी आणि त्याच्या सहकार्यांना 25 लाखाचे जामीन देण्याचे आदेश पोलीसांनी दिले होते. 

या पार्श्वभूमवर मनसेच्यावतीने बाळ नांदगावकर यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन जामीन रक्कम कमी कऱण्याची विनंती केली होती. त्यावर पोलीस आयुक्तांनी दिलेल्या उत्तरावरून राज ठाकरे यांनी पोलीस आय़ुक्तांवर टिकास्त्र सोडले होते. 18 नोव्हेंबर रोजी झालेल्या सभेमध्ये त्यांनी पोलीस आयुक्तांचा खरपुस समाचार घेतला होता. पोलिसांकडून कार्यकर्त्यांवर कोटीचे जामीन मागितले जात असताना आयुक्तांकडून चार ते पाच कोटीचे जामीन लावू असा इशारीही दिला होता.

सभेच्या दिवशीच जामीन रक्कम कमी करण्याचा निर्णय...  
राज ठाकरे यांच्या शनिवारच्या सभेच्या दिवशीच पोलीसांच्या नौपाडा विभागाकडून जामीन रक्कम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या तारखेची नोटीस मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली आहे. 

या नोटीसीमध्ये अविनाश जाधव आणि इतर कार्यकर्त्यांनी संयुक्त निवेदन देऊन ऐवढी जामीन रक्कम भरण्यास सक्षम नसल्याचा अर्ज दिला होता. त्यामुळेच ऐपतीप्रमाणे रक्कम करणी करण्यात येत असून प्रत्येकी 1 लाख रुपयांचा जामीनाची विचारणा करणारी नोटीस पोलीसांकडून देण्यात आली आहे.

ठाण्यातील या मनसे कार्यकर्त्यांना नोटीस...
अविनाश जाधव, रविंद्र मोरे, आशिष डोके, महेश कदम, सुशांत सुर्यराव, रविंद्र सोनार, संदिप साळुंखे आणि विश्वजीत जाधव या कार्यकर्त्यांकडून प्रत्येकी 1 लाखांचा जामीन मागणारी नोटीस पोलीसांनी पाठवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com