ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांना हवा एक कोटीचा जामीन

ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांना हवा एक कोटीचा जामीन

ठाणे : ठाणे स्थानकातील फेरीवाल्यांना मारहाण करून हुसकावणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांना दोनदा अटक करून ठाणे पोलीसांनी अडचणीत आणल्यानंतर आता या पदाधिकाऱ्यांना थेट एक कोटींचा जामीन देण्यासाठीची नोटीस बजावण्यात आली आहे. 

या प्रकरणात अविनाश जाधव याच्याकडून एक कोटी तर अन्य पदाधिकाऱ्यांकडून 25 लाखांचा जामीन का घेऊ नये? अशी नोटीस सहाय्यक पोलीस आयुक्त अभय सायगावकर यांनी बजावली आहे. 

या नोटीसीवर सात दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश या पदाधिकाऱ्यांना करण्यात आले आहेत. त्यामुळे मनसे पदाधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ठाणे रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांविरोधात मनसे पदाधिकाऱ्यांना धडक कारवाई करत या भागातील फेरीवाल्यांना मारहण करून हुसकावून लावले होते. या प्रकारानंतर मनसेच्या सात ते आठ पदाधिकाऱ्यांविरोधात नौपाडा पोलीस ठाणे आणि ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या दोन्ही पोलीस ठाण्यांतील पोलीसांनी आळीपाळीने मनसेच्या पदाधिकाऱ्यांना अटक करून त्यांच्या जामीनामध्ये वाढ केला होता. यामध्ये मनसे पदाधिकारी तीन ते चार दिवस पोलीस कोठडीमध्ये अडकून पडले होते. 

जामीनांवर सुटलेल्या या पदाधिकाऱ्यांवर थेट क्रिमिनल प्रोसीजर कोडच्या कलमान्वेय (चाप्टर केस) कारवाई सुरू केली आहे. त्या अन्वेय बजावलेल्या नोटीसांमध्ये एक कोटी आणि 25 लाख जामीनदार देण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिल्यामुळे या पदाधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 

न्यायालयाकडून पाच ते दहा हजाराच्या जामिनावर मुक्तता होत असताना पोलीस अशी मानमानी करत असल्याचे दावा मनसे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यानी केला आहे. हा जामीन दिल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा आंदोलन केल्यास त्यांची तेवढ्या रक्कमेची मालमत्ता सरकार जमा होणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com