मंत्रालयावर धडकणार मराठा मोर्चा.. मागण्या मान्य न झाल्याने 26 ऑगस्ट रोजी सरकारवर हल्लाबोल

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत युती सरकार गंभीर नसल्याचा आरोप करीत मराठा क्रांती ठोक मोर्चा सोमवारी (26 ऑगस्ट) रोजी थेट मंत्रालयावर धडकणार आहे. मुबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावरून निघणाऱ्या या मोर्च्यात हजारो लोक सामील होणार आहेत.
Maratha Morcha
Maratha Morcha
Published on
Updated on

ठाणे : मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत युती सरकार गंभीर नसल्याचा आरोप करीत मराठा क्रांती ठोक मोर्चा सोमवारी (26 ऑगस्ट) रोजी थेट मंत्रालयावर धडकणार आहे. मुबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावरून निघणाऱ्या या मोर्च्यात हजारो लोक सामील होणार आहेत. मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा राज्यभर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनी रविवारी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

'प्रलंबित मागण्यासाठी मराठा समाजाने आजवर 58 मूक मोर्चे आणि 2 ठोक मोर्चे काढले.त्यानंतर सरकारने विविध योजनांसह आरक्षण दिले. मात्र, याचा कुठलाही फायदा मराठा तरुणाला झालेला नाही.याउलट 2014 पासून मराठा समाजातील तरुण शिक्षण व नोकरीतून हद्दपार होताना दिसत आहे. आजवर सरकार पातळीवर अनेक बैठका झाल्या. परंतु, सरकारच्या उपसमितीने दुर्लक्ष केले आहे,' असे आरोप मराठा क्रांती मोर्चाने केले आहेत. 

यावर दोन दिवसात तोडगा काढला नाही तर राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी दिला आहे. यावेळी सकल मराठा मोर्चाचे समन्वयकदेखील उपस्थित होते.

काय आहेत मागण्या?
►आंदोलन काळातील सर्व गुन्हे मागे घ्यावेत
►2014 च्या विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्त्या द्याव्यात
►72 हजार मेगा भरती व एमपीएससीतील विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्याव्यात
►पीकविमा रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी
►नरेंद्र पाटील यांना तात्काळ निलंबित करावे किंवा महामंडळ बरखास्त करावे 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com