पुण्याचे अधिक्षक संदीप पाटलांनी केले तीन पोलिस बडतर्फ

आरोपींना गुन्हा दाखल झाल्याची माहिती देणे तसेच फिर्यादीवर दबाव आणून प्रतिज्ञापत्रकावर सह्या घेतल्याबद्दल तीन पोलिस कर्मचा-यांना जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी बडतर्फ केले आहे
Pune SP Sandip Patil Dismissed Three Cops
Pune SP Sandip Patil Dismissed Three Cops
Published on
Updated on

बारामती:आरोपींना गुन्हा दाखल झाल्याची माहिती देणे तसेच फिर्यादीवर दबाव आणून प्रतिज्ञापत्रकावर सह्या घेतल्याबद्दल तीन पोलिस कर्मचा-यांना जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी बडतर्फ केले आहे.  अभिजीत एकशिंगे (नेमणूक भिगवण पोलिस ठाणे), तात्या विनायक खाडे व भगवान उत्तम थोरवे ( दोघेही नेमणूक- बारामती शहर पोलिस ठाणे) या तिघांना पोलिस अधीक्षकांनी बडतर्फ केले आहे. 

पोपट तुकाराम थोरवे (रा. म्हसोबावाडी, ता. पुरंदर जि पुणे) यांनी त्यांना झालेल्या मारहाणीविरुध्द भिगवण पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिस कर्मचारी अभिजीत एकशिंगे यांनी त्यांच्या मोबाईलवरुन संबंधित आरोपींना दिली असे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द गंभीर गुन्हे दाखल आहेत व पोलिस त्याचा शोध घेत आहेत याची माहिती असूनही  एकशिंगे यांनी त्याच्याशी झालेल्या संभाषणाची माहिती प्रभारी अधिका-यांना दिली नाही. 

गुन्हा दाखल झाल्याची माहिती आरोपींना नव्हती, मात्र एकशिंगे यांच्या फोननंतर आरोपी निघून गेले. त्या मुळे या गुन्ह्यात त्यांना अटक करता आली नसल्याचा ठपका एकशिंगे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 

दरम्यान याच प्रकरणात बारामती शहर पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेले तात्या विनायक खाडे व भगवान उत्तम थोरवे यांनी आरोपींशी आर्थिक सलगी करुन पोपट तुकाराम थोरवे या फिर्यादीवर दबाव आणून  न्यायालयात प्रतिज्ञापत्रकावर सह्या करण्यास भाग पाडल्याचा ठपका या दोघांवर ठेवण्यात आला आहे. त्यांचे कृत्य घृणास्पद व विकृत असून पोलिस दलाच्या सचोटीस न शोभणारे व शिस्तीस बाधा असल्याचे नमूद करत पोलिस अधीक्षकांनी या तिघांना बडतर्फ केले आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com