जळगावच्या जिल्हाधिकाऱयांचा स्वच्छतेचा धडाका !

जळगावचे जिल्हाधिकारी किशोरराजे निबांळकर आपल्या कर्तृत्वाने खरंच जळगावकरांच्या मनाचे "राजे' ठरले आहेत. महापालिकेच्या प्रभारी आयुक्तपदाची सुत्रे स्विकारल्यानंतर त्यानीं शहरात सफाई मोहिम राबविली आता अतिक्रमणावर धडका सुरू केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून शहरातील अजिंठा चौफुली जवळील मोठे अतिक्रमण त्यांनी आज उध्वस्त केले. या कारवाईच्या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त होताच परंतु जिल्हाधिकारी स्वत: हजर होते.जळगावतील नागरिक त्यांच्या या कार्यावर खुश असून अनेक संघटनातर्फे त्यांचा सत्कारही करण्यात येत आहे.
Jalgav collector Nimbalkar
Jalgav collector Nimbalkar

जळगाव : जळगाव राजकीय आणि प्रशासकीयदृष्टीने अत्यंत संवेदनशील शहर आहे. त्यात जळगाव महापालिकेचे नाव ऐकले आजही त्या ठिकाणची नियुक्त म्हणजे परजिल्ह्यातील अधिकाऱ्यांनाच धडकीच भरते. आयुक्त व उपायुक्त तसेच नगररचना सहाय्यक संचालकपदी नियुक्ती झालेल्या काही अधिकाऱ्यांनी जळगावला न येता परस्पर बदली करून घेतली आहे. 

तर काही अधिकारी रूजू होतात परंतु कामापेक्षा रजेवरच अधिक असतात. कारण जळगाव महापालिकेचे राजकारणच तिढ्याचे आहेत.मात्र या राजकारणाला छेद देवून अवघ्या काही दिवसात आपल्या कामाची वेगळीच छाप प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी दाखविली आहे. त्यामुळे जळगावकर नागरिक सुखावले आहेत. 

जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून काम करतांना त्यांनी आपल्या कामाची वेगळीच छाप पाडली आहे. कोणताही प्रश्‍न अत्यंत सहजपणे हाताळून ते त्याचा निकाल लावीत आहेत. अगदी लोकाशाही दिनात तक्रारी देण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या जागेवर जावून ते त्याची समस्या ऐकून घेवून त्या सोडविण्याचे अधिकाऱ्यांना आदेश देत आहेत. त्यामुळे त्याची कार्यशैली जनतेला भावली आहे. 

जिल्हाधिकारीपदावर काम करीत असतांनाच जळगाव महापालिकेचे आयुक्त सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या रिक्त पदाचा प्रभारी कारभार त्यांच्याकडे आला. जळगाव महापालिकेचा कारभार तसा सुस्तच अगदी शहरात सफाईची मुलभूत सुविधाही नागरिकांना मिळू शकत नव्हती. पदभार स्विकारल्यानतंर अवघ्या दोन दिवसात त्यांनी सकाळी शहरातील विविध भागात सफाई पाहणीचा उपक्रम सुरू केला त्यामुळे महापालिकेचा आरोग्य विभागाला कामाला लागला, कधी नव्हे ती प्रत्येक वार्डात साफसफाई होवू लागली. 

त्यातच महापालिकेच्या संकुलाची सफाईचीही अवस्था वाईट होती, त्यानीं जळगावच्या गोलाणी संकुलाची पाहणी केली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता दिसून आल्याने त्यानीं सफाईसाठी कडक अमलबजावणी केली. सफाईसाठी संकुल बंद करण्याचे आदेश दिल्यामुळे दुकानदार हबकलेच आणि त्यानींही सफाई कामात सहभाग घेण्याचे आश्‍वासन दिले, त्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून सफाई मोहिम राबविण्यात आली.

 या संकुलात एकाच दिवसात तब्बल 78 ट्रॅक्‍टर कचरा काढण्यात आला. महापालकिेचे तब्बल 550 कर्मचारी या ठिकाणी कामाला लावण्यात आले होते. अस्वच्छ असलेले संकुल एका दिवसात चकाचक झाले. संकुल स्वच्छ होण्याची अशक्‍य वाटणारी बाब त्यांनी यशस्वी करून दाखविली.त्यामुळे व्यापाऱ्यांनी त्यांचा सत्कार केलाच परंतु जळगावातील "जळगाव फर्स्ट'तसेच इतर सामाजिक संघटनांनीही त्यांचा सत्कार केला.

 जिल्हाधिकारी एवढेच करून थांबले नाहीत तर त्यांनी आता महापालिकेच्या इतर संकुलाच पाहणी सुरू केली असून त्या ठिकाणी असलेल्या अतिक्रमणावर काढण्याचे आदेशही दिले आहेत.त्यामुळे जळगावकर त्यांच्या कार्यावर खुश आहेत. या शिवाय त्यांनी आता शहरातील महामार्गावरील अतिक्रमण काढण्याची धडक कारवाई सुरू केली आहे.

 शहरातील अजिंठाकडे जाणाऱ्या औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या चौफुलीवर गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होते. त्याबाबत अनेक वेळा तक्रारीही करण्यात आल्या होत्या. मात्र ते हटविण्याची कारवाई करण्यात आलेली नव्हती. निबांळकर यांनी आज हे अतिक्रमण काढून टाकले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कारवाईचे जळगावकरांनी स्वागत केले आहे, अशीच कारवाई होत राहिल्यास जळगावकर खरंच सुंदर होईल असा विश्‍वास नागरिकांना वाटत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com