चिखली अर्बनच्या ११ संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल, राणेंच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम...

चिखली पोलीस ठाण्याचे नायब पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश शिंदे Police Constable Prakash Shinde यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
Crowed in Union Minister Narayan Minister's program at Chikhali.
Crowed in Union Minister Narayan Minister's program at Chikhali. Sarkarnama
Published on
Updated on

बुलडाणा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ३१ ऑक्टोबर रोजी चिखलीतील रानवारा रिसॉर्टमध्ये चिखली अर्बन बॅंकेतर्फे उद्योजकता व प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या शिबिरात आयोजकांनी स्वतः मास्क लावले नव्हते आणि तेथे गर्दी केलेल्या लोकांनाही मास्क उपलब्ध करून दिले नव्हते. त्यामुळे बॅंकेच्या ११ संचालकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे नारायण राणे यांच्या कार्यक्रमाला कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कारण या शिबिराला जास्तीत जास्त संख्येने लोकांनी उपस्थित रहावे, यासाठी आयोजकांनी प्रयत्न केले होते. पण बोलाविलेल्या लोकांसाठी आवश्‍यक व्यवस्था केलेली नव्हती. त्यामुळे जमावबंदीचे कायद्याचे उल्लंघन आणि साथरोग नियंत्रण कायद्यानुसार ११ संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चिखली पोलीस ठाण्याचे नायब पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

आमदार संजय कुटे, आमदार आकाश फुंडकर, आमदार श्वेता महाले हे लोक प्रतिनिधीही कार्यक्रमात सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या कुणावरही कारवाई झाली नाही. पण आयोजकांना आरोपीच्या पिंजऱ्यात टाकण्यात आले आहे. आयोजकांकडून चूक झाली. पण केंद्रीय मंत्र्यांसह जिल्ह्यातील आमदारही कार्यक्रमाला उपस्थित होते. तेव्हा कुणाच्याही ही बाब लक्षात येऊ नये, याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. या कारवाईला पक्षीय रंग देण्याचेही प्रयत्न सुरू झाले आहेत. हाच कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारमधील कुण्या पक्षाचा असता, तर कारवाई झाली नसती. पण केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपचे आमदार उपस्थित असल्यामुळे कारवाई केली, अशी चर्चा शहरात जोर धरू लागली आहे.

Crowed in Union Minister Narayan Minister's program at Chikhali.
नारायण राणे त्या विमानात असल्याचे समजताच ठाकरेंनी दुसरे विमान मागवले...

चिखली अर्बन बॅंकेचे आशुतोष गुप्त, बँकेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम दिवटे, सरव्यवस्थापक संजय भंगिरे, संचालक मनोहर खडके, सुधाकर कुळकर्णी, राजेंद्र शेटे, विश्वनाथ जितकर, देवीदास सुरुशे, डॉ. गणेश मांटे, सुशील शेटे, शैलेश बाहेती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे बिनधास्त वावरणाऱ्या नागरिकांमध्ये जरब निर्माण झाली आहे. एरवी कुठलीही काळजी न घेता शहरात फिरणारे लोक मास्क लावून आणि सॅनिटायझरचा वापर करताना दिसत आहेत. कोरोनाचे संक्रमण कमी झालेले आहे, पूर्णपणे टळलेले नाही. हे सरकारकडून वारंवार सांगण्यात येते. पण लोक आता एकेकाळी असलेली कोरोनाची दहशत विसरत चालले आहेत. या कारवाईने अशा लोकांना चाप बसलेला दिसतोय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com