बुलडाण्याचे पालकमंत्री डॉ. कुटेंसमोर अपेक्षांचे ओझे पेलण्याचे आव्हान 

नुकतेच झालेल्या मंत्री मंडळाच्या विस्तारात आमदार डॉ. संजय कुटे यांच्या रूपाने मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याला कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली. त्याचवेळी बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही डॉ. कुटेंकडे दिले जाईल, अशी अपेक्षा होती. ती पूर्ण झाली. कमी कालावधीत अधिकाधिक अपेक्षांचे ओझे डॉ. कुटे कसे पेलतात, याकडे सर्वांचेच लक्ष राहणार आहे.
बुलडाण्याचे पालकमंत्री डॉ. कुटेंसमोर अपेक्षांचे ओझे पेलण्याचे आव्हान 
Published on
Updated on

बुलडाणा : नुकतेच झालेल्या मंत्री मंडळाच्या विस्तारात आमदार डॉ. संजय कुटे यांच्या रूपाने मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याला कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली. त्याचवेळी बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही डॉ. कुटेंकडे दिले जाईल, अशी अपेक्षा होती. ती पूर्ण झाली. कमी कालावधीत अधिकाधिक अपेक्षांचे ओझे डॉ. कुटे कसे पेलतात, याकडे सर्वांचेच लक्ष राहणार आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार म्हटला की डॉ कुटे यांचे नाव पुढे यायचे. त्याला कारण म्हणजे श्री. कुटे यांचे पक्षात असलेले वजन व कार्यक्षमता होय. ही कार्यक्षमता व धडपड चाणाक्ष मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरूवातीपासून हेरली होती. त्यामुळेच तरूणांना संधी देण्याकडे कल असलेल्या फडणवीस यांच्याशी डॉक्‍टरांची विश्वास पूर्ण मैत्री होती. त्यामुळेच त्यांनी मंत्रिपदासाठी कधीही दबाव, लॉबिंग, जातीपातीचा आधार घेतला नाही. त्याचे फळही त्यांना उशीरा का होईना पण मिळाले.

आपल्या आमदारकीच्या काळात डॉ. कुटे यांनी ज्या पद्धतीने मतदारसंघात शुद्ध पाणी, रस्ते, सुविधा, नागरी सुविधा, नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी धडाडीने प्रयत्न केले, तीच धडाडी आता जिल्ह्याच्या समस्या सोडवण्यासाठी व विकासकामे मार्गी लावण्यासाठी दाखवावी लागणार आहे.
कामगार व आर्थिक मागास, आदिवासी अशी मोठ्या खात्यांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. या खात्यांचा आवाका मोठा आहे. 

राज्यभरातील प्रश्न व अपेक्षाही मोठ्या आहेत. त्याकडे लक्ष देताना जिल्ह्याकडे दुर्लक्ष होऊ नये, याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. जिगावसाठी पाठपुरावा करणे, जिजाऊ जन्मस्थळाचा विकास, जिल्हाभरातील विकासप्रकल्प मार्गी लावणे, जगप्रसिद्ध लोणार सरोवराला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणे, महामार्गांच्या कामाला गती देणे अशा एक ना अनेक अपेक्षा त्यांच्याकडून आहेत. शिवाय पक्षाची जबाबदारी सुद्धा राहणार आहे. एक आमदार, मंत्री व आता त्याही पुढे जाऊन ऐतिहासिक आणि जागतिक वारसा लाभलेल्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाला नव्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे.
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com