बाळासाहेब आंबेडकरांना `अंडरइस्टीमेट' केले, तर कॉंग्रेसला परिणाम भोगावे लागतील : अशोक सोनोने 

बाळासाहेब आंबेडकरांना `अंडरइस्टीमेट' केले, तर कॉंग्रेसला परिणाम भोगावे लागतील : अशोक सोनोने 
Published on
Updated on

अकोला : महाराष्ट्रातील 12 लोकसभेच्या जागा वंचीत बहुजन आघाडीला देण्याचा प्रस्ताव आम्ही जून महिन्यातच कॉंग्रेसला दिला आहे. मात्र, केवळ अकोल्याची जागा आम्हाला सोडण्याची प्रसिद्धी माध्यमांमध्ये बातम्या पसरवून कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस टोलवाटोलवी करीत आहे. वंचीत बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात ओबीसी, धनगर, मुस्लीम, माळीसह इतरही समाजघटकांची भक्कम ताकद बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे उभी राहत आहे. त्यामुळे बाळासाहेबांना अंडरइस्टीमेट कराल तर त्यांचे परिणाम कॉंग्रेसला 2019 मध्ये भोगावे लागतील, असा हल्लाबोल भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी `सरकारनामा'शी बोलताना केला. 

लोकसभा निवडणुकीसंदर्भात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत बैठक सुरू आहे. अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांना सोडण्याची दोन्ही कॉंग्रेसची तयारी आहे. यासंदर्भात अशोक सोनोने यांना विचारले असता ते म्हणाले, की कॉंग्रेसकडून केवळ प्रसिद्धी माध्यमांमध्ये जागा वाटपावर चर्चा केल्या जाते. त्यांना आघाडीसंदर्भात बोलणी करायची असेल तर बाळासाहेबांशी समोरासमोर बोलणी करणे आवश्‍यक आहे. वंचीत बहुजन आघाडीने जून महिन्यातच कॉंग्रेसला प्रस्ताव दिला आहे. महाराष्ट्रातील ज्या 12 लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेस-राष्ट्रवादी हरली त्या जागा आम्ही मागितल्या. मात्र, हायकमांडला विचारतो म्हणत कॉंग्रेसच्या प्रदेश नेत्यांकडून त्यानंतर कोणतीच सकारात्मक बोलणी केली नाही.
 
या 12 जागांवर आम्ही ओबीसी, धनगर, मागासवर्गीय, माळी, आदिवासी, मुस्लीम सोबतच इतरही वंचीत समाजघटकाला उमेदवारी देऊन सत्तेचे भागिदार करण्याचा आमचा उद्देश आहे. मात्र, कॉंग्रेसचे नेते सेक्‍यूलर असल्याचा खोटा आव आणत वंचीतांना सत्तेपासून दुर ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप अशोक सोनोने यांनी केला. वंचीत बहुजन आघाडीच्या माध्यमातून वंचीत समाजघटकांची मोठी ताकद बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठिशी उभी राहिली आहे. त्यामुळे कॉंग्रेसला आम्हाला 12 जागा द्यावा अन्यथा राज्यातील 48 लोकसभेच्या जागा आम्ही सक्षमपणे लढविणार असल्याचे श्री. सोनोने म्हणाले. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com