पक्षाच्या गोटात : वंचित बहुजन आघाडी - १० आॅगस्टला पहिली यादी जाहीर होणार?

वंचित बहुजन आघाडीमुळे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतविभाजन होऊन कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक उमेदवारांना फटका बसला. काहींचा दारूण पराभव झाला. त्यामुळे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला महाआघाडीसोबत घेण्याबाबत कॉंग्रेसचे प्रदेशस्तरावरील नेते आग्रही आहेत. कॉंग्रेसच्या आघाडीच्या प्रस्तावाबाबत लवकरच अॅड. प्रकाश आंबेडकर कॉंग्रेसला पत्र लिहिणार आहेत.
पक्षाच्या गोटात : वंचित बहुजन आघाडी - १० आॅगस्टला पहिली यादी जाहीर होणार?
Published on
Updated on

लोकसभा निवडणुकीत अनेक जागांवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला जबर धक्का देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकांसाठीही जोरदार तयारी केली आहे. पक्षाकडून राज्यभरातील विधानसभा मतदारसंघांचा सामाजिक-राजकीय परिस्थितीनुसार अभ्यास पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही झाल्या असून सर्व २८८ जागांवर उमेदवार उभे करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे. कॉंग्रेसने आघाडीबाबत ठोस पुढाकार न घेतल्यास वंचित बहुजन आघाडीकडून १० ऑगस्टला उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्‍यता पक्षातील सूत्रांनी वर्तवली आहे. 

वंचित बहुजन आघाडीमुळे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतविभाजन होऊन कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक उमेदवारांना फटका बसला. काहींचा दारूण पराभव झाला. त्यामुळे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला महाआघाडीसोबत घेण्याबाबत कॉंग्रेसचे प्रदेशस्तरावरील नेते आग्रही आहेत. कॉंग्रेसच्या आघाडीच्या प्रस्तावाबाबत लवकरच अॅड. प्रकाश आंबेडकर कॉंग्रेसला पत्र लिहिणार आहेत. कॉंग्रेसने आधी 'वंचित'ही भाजपची "बी टीम' आहे, असा आरोप केला होता. या आरोपाबद्दल माफी मागितल्याशिवाय आघाडीबाबत बोलणीच करणार नाही, असे वंचित बहुजन आघाडीला कळवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

'इनकमिंग' लवकरच 
सध्या वंचित बहुजन आघाडीचा धसका कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी घेतला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसचे काही आजी-माजी आमदार वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. भाजपमधील इनकमिंगसोबतच "वंचित'कडेही आघाडीतील काही नेते जाण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

फुटीचा अपेक्षित परिणाम  नाही 
वंचित बहुजन आघाडीतून लक्ष्मण माने बाहेर पडले असले, तरी विदर्भ-मराठवाड्यात त्याचा फारसा परिणाम होणार नाही. पश्‍चिम महाराष्ट्रातही वंचित आघाडी नव्या व्यूहरचनेसह उतरली आहे. सध्या पक्षाचे भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांच्या नेतृत्वात वंचित आघाडीची एक समिती ३ ते ७ ऑगस्टदरम्यान पश्‍चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. तिथे इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत.

कार्यकर्ता प्रशिक्षण जोरात 
वंचित बहुजन आघाडीतर्फे कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. यात प्रामुख्याने समाज माध्यमांसह आपल्या भागात प्रभाव कसा निर्माण करायचा, नेटवर्क कसे वाढवायचे याचे प्रशिक्षण ठिकठिकाणी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीपासूनच महिला आघाडीने अधिकाधिक बैठकांचा धडाका सुरू ठेवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com