अकाेला : भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी भारिप- बहुजन महासंघाने कंबर कसली अाहे. या मतदारसंघात भारिपकडून महिला अाघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रतिभा अवचार व मुंबई येथील उद्याेजक राहुल डाेंगरे यांनी जाेरदार माेर्चेबांधणी सुरू केली अाहे. मात्र, पक्षाने राहुल डाेंगरे यांना ईशान्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष पद दिले असून मतदारसंघात त्यांचा फारसा राबता नाही. त्यामुळे अागामी निवडणुकीत उमेदवारीसाठी प्रतिभा अवचार अाणि राहुल डाेंगरे यांच्यात चुरस रंगणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू अाहे.
अागामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून माेर्चेबांधणी सुरू झाली अाहे. जिल्ह्याच्या राजकारणात अनुसूचीत जातीसाठी राखीव असलेला मुर्तिजापूर मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात अाहे. 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता असलेले हरिष पिंपळे यांना उमेदवारी देत भारिप बहुजन महासंघासह राष्ट्रवादी काँग्रेससमाेर तगडे अाव्हान उभे केले हाेते. या निवडणुकीत भाजपचे हरिष पिंपळे, भारिप-बमसंचे बलदेव पळसपगार अाणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य असलेल्या प्रतिभा अवचार यांच्यात तिरंगी लढत झाली हाेती.
भारिप अाणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये झालेले मतविभाजन भाजपच्या पथ्यावर पडले. 50 हजार 333 मते घेऊन पिंपळे विजयी झाले. बलदेव पळसपगार यांना 34 हजार 975 तर प्रतिभा अवचार यांना 34 हजार 500 मते मिळाली हाेती. त्यानंतर 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत अामदार हरिष पिंपळे यांच्या विरुद्ध भारिपने मुंबई येथील उद्याेजक राहुल डाेंगरे यांना उमेदवारी दिली. मात्र, भारिपला या निवडणुकीतही पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीनंतर प्रतिभा अवचार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला साेडचिठ्ठी देत भारिप-बहुजन महासंघामध्ये प्रवेश करीत मुर्तिजापूर मतदारसंघात ग्राऊंड लेव्हलवर माेर्चेबांधणी सुरू केली अाहे. दरम्यानच्या काळात अवचार यांची भारिप-बमसं महिला अाघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदावर वर्णी लागली.
जिल्हा परिषदेच्या विविध याेजनांची मतदारसंघात यशस्वी अंमलबजावणी करून मागावर्गीयांना लाभ देण्यासाठी अवचार यांचा सातत्याने पाठपुरावा राहिला. यासाेबतच महिला बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी महिलांची ग्रामीण भागात महिलांची माेठी फळी तयार केली अाहे. गत दाेन वर्षांत राजकीय घडामाेडी पाहता मुंबई निवासी असलेले राहुल डाेंगरे यांचा मुर्तिजापूर मतदारसंघात फारसा जनसंपर्क राहिलेला नाही. विशेष म्हणजे स्थानिक उमेदवार म्हणुन प्रतिभा अवचार यांचे पारडे जड समजले जाते. त्यातच भारिपने त्यांना ईशान्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष पद दिल्याने अागामी निवडणुकीत त्यांना पुन्हा उमेदवारी मिळेल की प्रतिभा अवचार यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल? हे पाहणे अाैत्सुक्याचे ठरणार अाहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.