अकाेल्यात शिवसेनेची महिला अाघाडी झाली 'ॲक्टीव्ह' 

जिल्ह्याच्या राजकारणात केवळ नावापुरती राहिलेली शिवसेनेची महिला अाघाडी पुन्हा 'ॲक्टीव्ह' झाली अाहे. अागामी लाेकसभा, विधानसभा अाणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पक्ष नेतृत्वाने महिला अाघाडीत माेठे फेरबदल करून विधानसभानिहाय जबाबदारी देण्यात अाल्या अाहेत.
अकाेल्यात शिवसेनेची महिला अाघाडी झाली 'ॲक्टीव्ह' 

अकोला : जिल्ह्याच्या राजकारणात केवळ नावापुरती राहिलेली शिवसेनेची महिला अाघाडी पुन्हा 'ॲक्टीव्ह' झाली अाहे. अागामी लाेकसभा, विधानसभा अाणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पक्ष नेतृत्वाने महिला अाघाडीत माेठे फेरबदल करून विधानसभानिहाय जबाबदारी देण्यात अाल्या अाहेत. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांकडून लवकरच जिल्ह्यात महिलांचा भव्य मेळावा घेऊन अागामी निवडणुकांची माेर्चेबांधणी करण्यात येणार असल्याने शहरासह ग्रामीण भागातील पदाधिकारी महिला सक्रीय झाल्या अाहेत. 

अागामी लाेकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘एकला चलाे रे’ चा नारा दिल्याने शिवसेनेकडून राज्यभरात स्वबळाची तयारी करण्यात येत अाहे. अागामी निवडणुकीत काेणत्याही परिस्थितीत भाजप पेक्षा जास्त जागांवर विजयी पताका फडकविण्याची रणनिती सेनेकडून अाखल्या जात असल्याने पक्ष पातळीवर माेठे फेरबदल करीत नव्या व जुन्या शिवसैनिकांची माेट बांधण्यात येत अाहे. जिल्ह्यात चार-पाच वर्षांपुर्वी शिवसेनेची महिला अाघाडी सक्रीय हाेती. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिकांसह ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सेनेच्या महिला सदस्यांचे संख्याबळ चांगले हाेते. मात्र, पक्षपातळीवर एकमेकांचे पाय अाेढण्याची वृत्तीने अाघाडीत मतभेदाचे राजकारण वाढत गेले. त्याचा फटका अनेक निवडणुकांमध्ये सेनेला बसला. 

पक्षाचे मेळावे, कार्यक्रमात महिला शिवसैनिकांची संख्या राेडावत चालल्याने पक्षाने ही बाब गंभीरतेने घेत जिल्ह्यात माेठे फेरबदल केले. अागामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर करण्यात अालेल्या या फेरबदलात अकाेला लाेकसभेच्या सहसंपर्क संघटकपदी ज्याेत्सना चाेरे, विधानसभेच्या अकाेला पूर्व, अकाेला पश्चिम व बाळापूर मतरदंसघाच्या जिल्हा संघटकपदी देवश्री ठाकरे, अकाेट व मूर्तिजापूर मतदारसंघाच्या संघटिका म्हणून माया म्हैसने यांच्याकडे जबाबदारी देण्यात अाली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी अाता मतदारसंघनिहाय बैठकांचा धडाका सुरू केला असून लवकरच जिल्ह्यात प्रदेश नेत्यांच्या उपस्थितीत महिलांचा मेळावा घेऊन अागामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com