सरकारने ‘हे’ ढोंग बंद करावे, अन् सरसकट नुकसान भरपाई द्यावी : वंचितची मागणी

मुख्यमंत्री The Chief Minister पुन्हा दौरा करणार, असे जाहीर करण्यात आले आहे. हा फार्स सरकारने बंद करावा.
Rekha Thakur Vanchir
Rekha Thakur VanchirSarkarnama
Published on
Updated on

अकोला : विदर्भ आणि मराठवाड्यात उद्भवलेल्या पुरपरिस्थितीमुळे जनसामान्यांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके पुरात वाहून गेली आहेत आणि सरकार पंचनामे आणि दौरे करण्याचे ढोंग करीत आहे. सरकारने हे ढोंग बंद करावे, अन् शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वंचित बहूजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी केली आहे.

अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीन, मूग, उदीड, कापूस, केळी यांसह हाताशी आलेली सर्व पीकं उद्धवस्त झाली आहे. त्यामुळे सरकारनं तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पैसे जमा करावेत

पावसानं मराठवाडा, विदर्भ व पश्चिम आणि ऊत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेली पीकं नष्ट झाली आहेत. त्यामुळे केवळ घोषणा न करता शेतकऱ्याला शासनाकडून तात्काळ मदत मिळणं गरजेचं आहे. सरकारकडून फक्त पंचनाम्याचे आदेश दिले जात आहेत. यापलीकडे काही केलं जात नाही. सरकारने हे ढोंग बंद करून तातडीने नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. पावसामुळे सरकारी ३३ टक्के नुकसानीच्या निकषांहून अधिक पिकांचं नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर होणे गरजेचे आहे.

ओला दुष्काळा करीता कोरडवाहू शेतीसाठी जवळपास १३ हजार रुपये प्रति हेक्टर आणि बागायती शेतीसाठी जवळपास १८ हजार रुपये प्रती हेक्टर नुकसान भरपाई जाहीर होते. ही नुकसानभरपाई अपुरी असून अल्पबाधित शेतकऱ्यांना ५० हजार रुपये आणि जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एक लाख रुपये सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी वंचित बहूजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी केली आहे. मागे उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केला होता. मात्र त्यावेळी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली. मुख्यमंत्री पुन्हा दौरा करणार, असे जाहीर करण्यात आले आहे. हा फार्स सरकारने बंद करावा, असे आवाहन देखील वंचितच्यावतीने करण्यात आले आहे.

Rekha Thakur Vanchir
औरंगाबाद महापालिका निवडणुकीत "वंचित बहुजन आघाडी'ची वेगळी चूल

शेतकऱ्यांची वीज पुरवठा तोडणी थांबवा

थकित वीज बिलाच्या नावावर शेतकऱ्यांची सक्तीने वीज पुरवठा खंडित करण्याचे काम वीज मंडळाच्यावतीने सुरू आहे. याचा वंचित बहूजन आघाडी विरोध करत आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जाऊ नये, अशी मागणी देखील रेखा ठाकूर यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com