मधुकरराव कांबळे भाजपवासी की काँग्रेसवासी?

राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या लाेकशाहीर अण्णाभाऊ साठे अांतरराष्ट्रीय स्मारक समितीच्या उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव पदावर वर्णी लागल्यावर काँग्रेसचे प्रदेश महासचिव मधुकरराव कांबळे यांची पावले पुन्हा भाजपकडे वळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू हाेती. मात्र, सहा महिन्याचा कालावधी लाेटला तरी मधुकररावांच्या भाजप प्रवेशाचा अद्यापही मुहुर्त निघाला नाही. त्यामुळे मधुकरराव भाजपवासी की काँग्रेसवासी? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली अाहे.
मधुकरराव कांबळे भाजपवासी की काँग्रेसवासी?
Published on
Updated on

अकाेला : राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या लाेकशाहीर अण्णाभाऊ साठे अांतरराष्ट्रीय स्मारक समितीच्या उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव पदावर वर्णी लागल्यावर काँग्रेसचे प्रदेश महासचिव मधुकरराव कांबळे यांची पावले पुन्हा भाजपकडे वळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू हाेती. मात्र, सहा महिन्याचा कालावधी लाेटला तरी मधुकररावांच्या भाजप प्रवेशाचा अद्यापही मुहुर्त निघाला नाही. त्यामुळे मधुकरराव भाजपवासी की काँग्रेसवासी? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली अाहे. 

पश्चिम विदर्भातील राजकारणात मधुकरराव कांबळे हे नाव संघर्ष करणारे व्यक्तीमत्व म्हणून अाेळखले जाते. लाेकशाहीर अण्णाभाऊ साठे अाणि लहुजी साळवे यांच्या विचारांनी प्रेरीत हाेत 1975 पासून मधुकरराव समाजकारण अाणि राजकारणात सक्रीय झाले. समाजातील उपेक्षीत घटकांना न्याय द्यायचा असेल तर राजकीय व्यासपीठाशिवाय पर्याय नाही हे हेरून त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांनी समाजकारण अाणि राजकारणात अधिक सक्रीय हाेत समाजहिताचे कार्य सुरूच ठेवले. त्याची दखल घेत पक्षाने 1993 मध्ये त्यांना महात्मा फुले अार्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद दिले. त्यानंतर 1999 मध्ये मधुकररावांनी मातंग समाजातील अनेक नेते, पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसला साेडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीत प्रदेश उपाध्यक्ष पदावर त्यांनी काम केले. 

भाजपचे नेते (कै.) गाेपीनाथ मुंडे यांच्या अाग्रहाखातर त्यांनी 2003 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना प्रदेश उपाध्यक्ष पद देण्यात अाले. भाजपमध्ये असताना त्यांनी मातंग समाजाचे प्रश्न अाक्रमकपणे मांडले. अनुसूचीत जाती, जमाती, अाेबीसी समाजासाठी काम करणाऱ्या भाजपच्या काेअर कमिटीमध्ये विद्यमान राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांच्यासाेबत मधुकररावांनी काम केले होते. 2009 मध्ये त्यांनी वाशिम मतदार संघातून उमेदवारीचा दावा केला. मात्र, भाजपमध्येही त्यांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे मे 2011 मध्ये भाजपला साेडचिठ्ठी देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

केंद्र व राज्यात काँग्रेसची सत्ता असतांना मधुकररावांनी लाेकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे अांतरराष्‍ट्रीय स्मारक उभारण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. अण्णाभाऊ साठे यांची घाटकाेपरमधील वास्तू असलेल्या जागा मालकाचा शाेध घेतला. तत्कालीन सामाजीक न्यायमंत्री शिवाजीराव माेघे यांच्यासाेबत अनेक बैठका घेऊन स्मारकासंदर्भात सकारात्मक पावले उचलली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णाभाऊ साठे यांचे अांतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याचे काम हाती घेतल्यावर तातडीने पावले उचलत राज्यमंंत्री दिलीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन केले. या समितीच्या उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव पदावर मधुकररावांची वर्णी लावल्याने मधुकरराव लवकरच भाजपवासी हाेणार अशी, चर्चा राजकीय वर्तुळात रंगली हाेती. मुख्यमंत्री फडणवीस म्हणतील तेव्हा अापण भाजपमध्ये प्रवेश करू, असे मधुकरराव सांगतात. मात्र सहा महिन्यांचा कालावधी लाेटला तरी त्यांच्या भाजप प्रवेशाचा अद्यापही मुहुर्त निघालेला नाही. त्यामुळे मधुकरराव भाजपवासी की काँग्रेसवासी? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली अाहे.
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com