rohit pawar-niranjan dawkahre 
जीआर

तुमचं राजकारण घरातच ठेवा : रोहित पवार वैतागले

....

सरकारनामा ब्यूरो

पुणे : भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केलेले कौतुक यावर राष्ट्रवादीतून तीव्र प्रतिक्रिया आली आहे. राष्ट्रवादीच्या समर्थकांनी डावखरे यांना ट्रोल केलेच पण पक्षाचे दुसरे आमदार रोहित पवार यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे.

``राजकारण आम्हालाही करता येतं, पण आज ती वेळ नाहीय. संकटाच्या काळात तरी तुमचं राजकारण 'होम क्वारंटाईन' करा. तुमचा एवढा 'अभ्यास' व अनुभव असेल तर मदत करायला तुम्हाला अडवलं कुणी,``अशा शब्दांत रोहित यांनी डावखरे यांच्यावर हल्ला चढवला.

शिवसेनेकडून वरुण सरदेसाई यांनी डावखरेंच्या विधानाचा समाचार घेतला होता. फडणवीस यांना एवढा अनुभव आहे तर त्यांना चीनमधील वुहानमध्ये पाठवा, असा तिरकस सल्ला सरदेसाईंनी दिला होता.

डावखरे यांनी सध्या महाराष्ट्राला शून्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाही तर आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी असणाऱ्या प्रशासकाची म्हणजेच देवेंद्र फडणवीसांची गरज आहे, असे ट्विट केले होते. त्यावरून राजकीय वाद सुरू झाला. 
`सरकारनामा`ने याबाबत फेसबुकवर पोल घेतला होता. फडणवीस यांनी कोरोनाची स्थिती अधिक चांगली हाताळली असती का, या प्रश्नावर दोन्ही बाजूंनी तीव्र मते व्यक्त झाली आहेत. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT