another extortion case registered against parambir singh
another extortion case registered against parambir singh 
ठाणे

परमबीरसिंह यांचा पाय खोलात...बिल्डरला मागितली 4 कोटी 68 लाखांची खंडणी

सरकारनामा ब्युरो

ठाणे : बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्यामुळे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Parambir Singh) यांच्या विरोधात मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात आधी गुन्हा दाखल झाला होता. आता ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यातही त्यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा (Extortion) दाखल झाला आहे. परमबीरसिंह यांनी 4 कोटी 68 लाख रपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला असून, यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याप्रकरणी गुरूवारी मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर काल (ता.23) ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात शरद अग्रवाल या व्यापाऱ्याकडून 4 कोटी 68 लाख रुपयांची खंडणी मागितली तसेच, जमीन जबरदस्तीने नावावर केल्याच्या आरोपावरुन परमबीरसिंह यांच्यासह तत्कालीन पोलीस उपयुक्त (गुन्हे) पराग मणेरे यांच्यासह संजय पुनामिया, सुनील जैन, मनोज घोटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शरद अग्रवाल आणि त्यांचा भाऊ शुभम या दोघांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकविण्याची धमकी देण्यात आली होती. धमकावून त्यांच्याकडून दोन कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्यात आल्याचा आरोप या तक्रारीत केला आहे. शरद यांची आई द्रोपदादेवी यांच्या मालकीची जमीनही जबरदस्तीने किरकोळ भावात केवळ एक कोटी रुपयांना विकत घेतल्याचे खरेदीखत आरोपींनी तयार केले. 

याचबरोबर शरद अग्रवाल याचे काका श्यामुसंदर अग्रवाल यांनाही मोक्का कायद्यान्वये कारवाईची धमकी देण्यात आली होती. त्यांना 2 कोटी 68 लाख रुपयांचे धनादेश खासगी व्यक्तींना देण्यास भाग पाडले. तसेच, त्यांच्या मालकीची सिन्नर येथील जमीनही बाजारभावापेक्षा कवडीमोल किमतीत विकत घेण्यासाठी जबरदस्तीने करार तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शरद अग्रवाल यांच्या फिर्यादीनुसार परमबीरसिंह आणि उपायुक्त पगार मणेरे यांच्यासह अन्य तीन व्यक्तींच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT