ठाणे

मराठा समाजाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी कटिबद्ध : एकनाथ शिंदे  

सरकारनामा ब्युरो

बदलापूर : "समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचा, सर्वधर्म समभाव हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार महोत्सवांमधून पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचे कार्य करीत आहोत. असे कार्य करणाऱ्या मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी राज्य सरकारमध्ये आहे. मराठा समाजाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे', अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 

स्वराज्य प्रतिष्ठान, मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज यांच्यातर्फे बदलापूरमध्ये प्रथमच सात दिवस "मराठा महोत्सव 2018' भरवण्यात आला. पूर्वेतील कार्मेल हायस्कूजवळील तालुका क्रीडा संकुलात सुरू असलेल्या महोत्सवास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच भेट दिली. त्या वेळी शिंदे बोलत होते. 

या वेळी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नगराध्यक्षा विजया राऊत, नगरसेवक शैलेश वडनेरे, तुकाराम म्हात्रे, नगरसेविका शीतल राऊत आदी उपस्थित होते. 

मराठा समजाच्या आरक्षणाचा महत्त्वाचा प्रश्‍न सरकारच्या विचाराधीन आहे. यासाठी असलेल्या सरकारी समितीत मी समाजाचा प्रतिनिधी म्हणून आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातही आपला प्रतिनिधी म्हणून मी आहे. त्यामुळे समाजाचे प्रश्‍न आणि समस्या निश्‍चित सुटतील, असा विश्‍वासही शिंदे यांनी या वेळी व्यक्त केला. 

मराठा महोत्सवाचे भव्य आयोजन करताना समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून जात-धर्म-पंथ असा भेदभाव न बाळगता आपण हा महोत्सव यशस्वी करत आहात, ही कौतुकाची बाब आहे, या शब्दात शिंदे यांनी संयोजकांची पाठ थोपटली.
 
आयोजक कालिदास देशमुख यांनी स्वागत केले. आशीष गायकवाड यांनी आभार मानले. मराठा समाजाचे पदाधिकारी संतोष रायजाधव, जितेंद्र पाटील, सुनील पाटील, अरुण चव्हाण, हेमंत यशवंतराव, विश्‍वनाथ पोखरकर, गजानन पाटील, एन. डी. पाटील आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT