Uddhav Thackarey in Thane : उद्धव ठाकरे हे ठाण्यात दौऱ्यावर आहेत. त्यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले, मात्र टेंभीनाका येथील आनंद आश्रमाकडे पाठ फिरविली. दरम्यान येथील पूर्वीच्या शिवसेनेच्या फलक काढून तेथे शिंदे गटाकडून (Shinde Group) बाळासाहेबांची शिवसेना (Balasaheb's Shivsena) हा फलक लावण्यात आला आहे.
या कृत्यावरून शिंदे गट शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंभीनाका येथील आनंद आश्रम (Anand Ashram) ही मूळ शिवसेनेची शाखा 'हायजॅक' करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप ठाकरे समर्थकांकडून होऊ लागला आहे. तसेच उद्धव ठाकरे ठाण्याच्या दौऱ्यावर असतानाच अचनाकपणे हा फलक लावल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
टेंभीनाका येथील आनंद आश्रमात शिवसेनेने दिवंगत नेते आनंद दिघे वास्तव्यास होते. या आश्रमात आनंद दिघे शिवसेनेचा कारभार चालवत होते. तेथेच जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत होते.
दिघे यांच्या निधनानंतर त्या आश्रमात शिवसैनिक उपस्थित राहत होते. आता शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले आहेत. मात्र या आनंद आश्रमात दोन्ही गटाचे कार्यकर्ते उपस्थित राहत होते. त्यावरून त्यांच्यात चढाओढ सुरू होती.
दरम्यान आज उद्धव ठाकरे ठाण्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी दिवगंत आनंद दिघे यांच्या पुतळ्याला आभिवादन केले. मात्र त्यांनी आनंद आश्रमाकडे जाणे टाळले. मात्र अचानक आनंद आश्रमाबाहेर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा फलक बसविण्यात आला.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) येणार असल्याचे कळताच अचानक हे फलक उभारण्यात आला आहे, असा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.