date sadanand.jpeg
date sadanand.jpeg 
ठाणे

पोलिस ठाण्यात इस्टेट एजंटचा वाढदिवस साजरा : आयुक्त सदानंद दातेंनी दिले चौकशीचे आदेश

चेतन इंगळे

नालासोपारा : नव्याने स्थापन झालेल्या मीरा भाईंदर पोलिस आयुक्तालयातील तुळींज पोलीस ठाण्यात एका इस्टेट एजंटाचा पोलीस कर्मचाऱ्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करणे तेथील निरीक्षक दत्तात्रय पाटील यांना भोवले आहे. मीरा भाईंदर आणि वसई- विरारचे आयुक्त सदानंद दाते यांनी पाटील यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

सहायक पोलिस आयुक्त संजयकुमार पाटील यांच्याकडे ही चौकशी देण्यात आली आहे. तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील हे कोरोनाशी झुंज देवून रुजू झाले होते. त्याच दिवशी इस्टेट एजंट सचिन गाला याने केक आणून पोलिस ठाण्यात कापला. याचा व्हिडीओ सचिन यानेच व्हायरल केला. त्यानंतर आयुक्त सदानंद दाते यांनी पाटील यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबत बोलताना सचिन गाला यांनी सांगितले की माझ्यावर साधी `एनसी` सुद्धा  नाही. मात्र पोलिस हे  गाला याच्यावर कोणत्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत का, याचा शोध घेत आहेत. हा केक पाटील यांच्या स्वागताचा होता की गाला यांच्या वाढदिवसाचा यावर आता चौकशी सुरू आहे. 

सहायक पोलिस आयुक्त संजयकुमार पाटील यांनी याबाबत अधिकृत माहिती देण्यास नकार दिला. पुढील दोन दिवसात अहवाल आल्यानंतर दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT