bjp_
bjp_ 
ठाणे

कल्याण-अंबरनाथ विधासभेसाठी भाजपमध्ये भरती सुरु

दिनेश गोगी

उल्हासनगर: उल्हासनगरचे माजी माजी उपमहापौर  शिवसेनेचे  विनोद ठाकूर यांच्या सोबत व्यावसायिक रवी पाटील,साई पक्षाचे अमर लुंड व शिवसेनेच्या काही माजी शाखा प्रमुखांनी भाजपात प्रवेश केला आहे.व 2017 मध्ये पार पडलेल्या  निवडणुकीत विनोद ठाकूर शिवसेनेचे उमेदवार होते . 

कल्याण पूर्व विधानसभा निवडणुकीत गेल्यावेळी गणपत गायकवाड यांनी कमी मत फरकाने शिवसेनेचे गोपाळ लांडगे यांचा पराभव केला होता, तर अंबरनाथ विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे डॉ.बालाजी किणीकर यांनी भाजपचे राजेश वानखेडे यांच्यावर निसटता विजय मिळवला होता  . यावेळी  कल्याण-अंबरनाथच्या जागेवर विजय संपादन करण्याच्या उद्देशाने भाजपाने ही प्रवेश देण्याची रणनीती आखल्याचे उघडपणे बोलले जात आहे.

कालरात्री कॅम्प नंबर 5 मधील सभागृहात राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालीनी, भाजपा जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी, महापौर पंचम कलानी यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी 2015 मध्ये साई पक्षाकडून उपमहापौर असलेले व 2017 च्या निवडणुकीत शिवसेने कडून निवडणूक लढवणारे विनोद ठाकूर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांचे चिरंजीव धिरज ठाकूर यांनी देखील शिवसेना युवासेना अधिकारी पदाला सोडचिठ्ठी देऊन दोनतीन वर्षांपूर्वीच भाजपात प्रवेश केलेला आहे.

ठाकूर यांच्या सोबत भाजपा नगरसेवक विजय पाटील यांचे भाऊ व नगरसेविका मिनाक्षी पाटील यांचे पती रवी पाटीलयांनीही भाजप प्रवेश केला . शिवाय साई पक्षाचे नगरसेवक शेरी लुंड यांचे भाऊ व नगरसेविका कंचन लुंड यांचे पती अमर लुंड आणि  शिवसेना शाखाप्रमुख भारत आहुजा यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे . त्यामुळे  कल्याण-अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात भाजपचे बळ वाढले आहे . 

यावेळी सभागृह नेते जमनादास पुरस्वानी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बच्चाराम रुपचंदानी,नगरसेवक विजय पाटील,राजेश वानखेडे,किशोर वनवारी,डॉ.प्रकाश नाथानी,मनोज लासी,प्रदिप रामचंदानी,नगरसेविका मीना सोंडे, अर्चना करण काळे, मिनाक्षी पाटील, शुभंगीनी निकम ,पदाधिकारी राजा गेमनानी, किशोर जग्याशी, कमल पंजाबी आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT