Jitendra-Avhad
Jitendra-Avhad 
ठाणे

जितेंद्र आव्हाडांचा मोदींवर 'मधुर' हल्लाबोल !

सरकारनामा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहेमी चर्चेत असतात. सोशल  मीडियावर विरोधक त्यांना अनेकदा ट्रॉलदेखील करतात. पण आव्हाड आपल्यावरील टीकेने किंचितही डगमगत नाहीत .

बुधवारी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध नवाच फंडा वापरला आहे. आपण शालजोडीतून टोले लगावले असे नेहेमी ऐकतो. पण जितेंद्र आव्हाडांनी गाण्यातून टीकेचा नवा फंडा आणलाय. आता त्यांचे गायन कसे हे आपणच ऐकून ठरवा . 


आपल्या व्हायरल व्हीडिओ मध्ये ते म्हणतात," आज सर्वोच्च  न्यायालयामध्ये राफेलची कागदपत्रे चोरीला गेली आहेत, गहाळ झाली आहेत असे विधान सरकारी वकिलांनी केले आहे आणि माझ्या आठवणी जाग्या झाल्या. १९७३ मध्ये राजा रानी  चित्रपट आला होता. त्या चित्रपटामध्ये मस्त गाणं होतं .

आशा भोसले आणि भूपिंदर सिंग यांनी ते गायलं होतं आणि त्याचे शब्द असे काही होते  ...

दिल्लीकी गलियोंमे  जब अंधेरा होता है ,

आधी रात के बाद ,

एक चोर निकलता है ....

असे म्हणत त्यांनी गाण्याचा संपूर्ण मुखडाच आपल्या 'मधुर' आवाजात गावून दाखवला आहे .

शेवटी त्यांनी अशीही कॉमेंट केली की आता मला सांगा, अंधारामध्ये चोरी होणे वेगळे आहे ! पण या देशात दिवसाढवळ्या चोऱ्या  व्हायला लागल्यात! आता जे स्वतःला चौकीदार म्हणतात, पहारेकरी म्हणतात  त्यांच्याच हातातून फायली जात आहेत . मग चुकीचे काय आहे ? चौकीदार चोर है !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT