ठाणे

चित्रपटगृहचालकांना मनसेचा `दे धक्का'!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : खाद्यपदार्थांची अवाच्या सव्वा दराने होणारी विक्री रोखण्यासाठी मनसेने राज्यात ठिकठिकाणी चित्रपटगृहांना धडक देण्याची मोहीम हाती घेतली आहे. 

पुणे, मुंबईपाठोपाठ नवी मुंबई, कल्याण, अंबरनाथमध्ये रविवारी कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत चित्रपटगृह व्यवस्थापनाला धारेवर धरले. 

मल्टिप्लेक्‍समधील खाद्यपदार्थांच्या दरांबाबत सरकार काही निर्बंध आणू शकत नाही का, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला होता. त्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेत मल्टिप्लेक्‍सवर धडक देण्यास सुरुवात केली. 
अंबरनाथमधील बिग सिनेमा या चित्रपटगृहावर मनसे पदाधिकाऱ्यांनी धडक दिली. खाद्यपदार्थांचे दर कमी न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा या वेळी देण्यात आला. 

कल्याण पूर्वेतील मेट्रो मॉल आयनॉक्‍समध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चित्रपट पाहायला आलेल्या मुलांना पॉपकॉर्न आणि चिप्सचे वाटप करून अनोखे आंदोलन केले. नवी मुंबईतील बालाजी थिएटर्स आणि रघुलीला मॉलमधील सिनेमॅक्‍ससमोर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत खाद्यपदार्थांचे दर आठ दिवसांत कमी करण्याची मागणी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT