Naresh Mhaske, aditya thackeray
Naresh Mhaske, aditya thackeray sarkarnama
ठाणे

Naresh Mhaske : युती धर्म तोडून घटनाबाह्य महाविकास आघाडी कुणी केली? ; म्हस्केंचा पलटवार..

सरकारनामा ब्यूरो

ठाणे : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आज पुन्हा एकदा शिंदे- फडणवीस सरकारवर होती. शेतकऱ्यांना मदत केली जात नाही आणि राज्यातील मोठे मोठे उद्योग राज्यातून निघून जात आहेत. या घटनाबाह्य सरकारवर कोणाचा विश्वास राहिलेला नाही, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. आता याला शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी जशास तसे उत्तर दिले आहे.

नरेश म्हस्के म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री घटनाबाह्य वाटणाऱ्यांचं वक्तव्य अतिशय बालीश प्रकारचं असून, त्यांनी कोणत्याही अभ्यासाशिवाय ते केले आहे. 2019 साली राज्यात भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचे सोडून, युती धर्माचे उल्लंघन करून स्वतःला मंत्री आणि वडीलांना मुख्यमंत्री करण्यासाठी काँग्रेस - राष्ट्रवादीसोबत घटनाबाह्य आघाडी कुणी स्थापन केले, असा पलटवार म्हस्के यांनी केला आहे.

खरंतर वरळी मतदारसंघामधून निवडून आलेले सुनील शिंदे यांना तिकीट नाकारून, त्यांनी मतदारसंघात करून ठेवलेल्या केलेल्या आयत्या कामावर आपण निवडून आलात. तेव्हा आपण आपल्याच पक्षातल्या सच्च्या कार्यकर्त्यावर अन्याय करतोय, असे आपल्याला वाटले नाही का? असा सवालही म्हस्के यांनी विचारला. आम्ही आजही तुमचा उल्लेख साहेब असा करतोय, पण आपण पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अशाप्रकारे उल्लेख केलात तर आम्हाला देखील आमचा संयम सोडावा लागेल, असा इशाराही म्हस्के यांनी ठाकरेंना दिला.

दरम्यान आदित्य ठाकरे यांनी शिंदेवर जोरदार टीका केली होती. 'डबल इंजिन सरकार असं हे बोलत होते, पण डबल इंजिन मधलं एक इंजिन फेल गेलं आहे. देशातील उद्योजकांना या घटनाबाह्य सरकारवर विश्वास विश्वास राहिलेला नाही. घाणेरडं राजकारण केलं जात आहे. शिंदेंची सेना ही गद्दारांची सेना आहे, महाराष्ट्र यांना माफ करणार नाही, अशी बोचरी टीका आदित्य यांनी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT