pooja-bedi
pooja-bedi 
ठाणे

पूजा बेदीने ट्विट केलेला फोटो पाहून तुम्हीही म्हणाल....

सरकारनामा ब्यूरो

मुंबई :  कोरोना विषाणूचा संसर्ग भारतासह सर्व जगात पसरत चालला आहे. चीन वगळता इतरत्र तो थांबण्याचे नाव घेत नाही. या रोगाची भयानकता सर्व जग अनुभवत आहे. पण यातही काही नागरिक त्याला न जुमानता पर्यटन करीत आहे. याच मुद्दा पकडून प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बेदीने सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. मुंबई येथील वर्सोवा बिचचा फोटो तीने ट्विट केला आहे.

पूजा बेदीने हा फोटो ट्विट करून त्यात म्हटले आह की `हाच का तुमचा लॉकडाऊन? लोक समुद्र किनाऱ्यावर सुट्यांमुळे समुद्र किनाऱ्यावर फिरायला आले आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या आपण कशी कमी करणार? पूजाने या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाराष्ट्र पोलिसांना टॅग केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसाचा लॉक डाऊन केला आहे. तो फक्त कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वत्र पसरू नये. पण यातील काही लोकांना यातील गंभीरपणा दिसून येत नाही. लॉकडाऊनमध्ये काम बंद असल्यामुळे काही लोक विनाकारण रस्त्यांवरून फिरत आहेत. काही जण सुटी मिळाल्याच्या आनंदात कुटुंबासोबत बाहेर वेळ घालवत आहेत. याचे सर्व गंभीर परिणाम संपूर्ण जनतेला भोगावे लागण्याची शक्यता आहे. लॉक डाऊनच्या काळात लोक पर्यटनाला! कोरोना कसा रोखणार, असे त्यामुळेच पूजा बेदीच्या फोटोनंतर प्रत्येकाला म्हणावे लागेल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT