ठाणे

अलिबागमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांत `शेकाप'चीच सरशी

सरकारनामा ब्युरो

अलिबाग : अलिबाग तालुक्‍यात 15 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत शेकापचे 10 सरपंच निवडून आले आहेत; तर कॉंग्रेसने आवास, खानाव, खिडकी ग्रामपंचायतीमध्ये निर्विवाद विजय मिळवत सरपंचपदही मिळविले आहे. 

शिवसेनेने कामार्ले ग्रामपंचायत शेतकरी कामगार पक्षाकडून हिरावून घेतली. माणकुळे ग्रामपंचायत भाजपने जिंकत तालुक्‍यात पक्षाचे खाते उघडले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा तालुक्‍यातील हा पहिला विजय ठरला आहे. 

अलिबागमध्ये प्रतिष्ठेच्या ठरलेल्या नागाव ग्रामपंचायतीमध्ये निखिल मयेकर हे शेकापचे उमेदवार विजयी झाले आहेत, तर वाडगाव ग्रामपंचायतीमध्ये सातपैकी सहा सदस्य शेकाप-राष्ट्रवादी आघाडीचे निवडून आले आहेत. या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सरीता भगत 910 मते मिळवून विजयी झाल्या आहेत. 

माणकुळे ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे सुजित गावंड हे 896 मते मिळवून सरपंच म्हणून निवडून आले आहेत. येथे एकूण 9 सदस्यांपैकी 4 सदस्य शेकापचे निवडून आले आहेत. 

अलिबाग तालुका हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. यावेळी शेकापने दोन ग्रामपंचायती गमावल्या आहेत, तर शिवसेनेला एकाच ग्रामपंचायतीवर सरपंच निवडून आणता आला आहे. 

शेकापला तालुक्‍यात नऊ ग्रामपंचायती मिळाल्या असून 83 सदस्य निवडून आले आहेत. शिवसेना, कॉंग्रेस, भाजप आणि इतर पक्षांचे 74 सदस्य निवडून आले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT