Palghar ZP sarkarnama
ठाणे

पालघर जिल्हा परिषदेत शिवसेनेला फायदा, राष्ट्रवादीची आकडेमोड...

जिल्हा परिषदेवर सेना, राष्ट्रवादीची ताकत असली तरी मात्र, राष्ट्रवादीच्या सदस्यांची संख्या घटली आहे.

सरकारनामा ब्युरो

वसई : पालघर जिल्हा परिषदेच्या एकूण १५ व पंचायत समितीच्या १४ जागांसाठी पोटनिवडणुका घेण्यात आल्या. जिल्हा परिषदेवर शिवसेना-भाजपला समसमान जागा मिळाल्या असल्या तरी यात सेनेला फायदा झाला आहे. तर राष्ट्वादीला दोन जागांवर नुकसान सहन करावे लागले आहे.

जिल्हा परिषदेसाठी पालघर (२), डहाणू (४), तलासरी (१). विक्रमगड (१), मोखाडा (२ ), वाडा (५ ) अशा एकूण १५ जागांपैकी शिवसेनेने पाच, राष्ट्रवादी पाच, भाजप ४ तर सीपीएमला एका जागेवर विजय मिळवता आला आहे. जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यातच आता निवडून आलेले सदस्यांचा समावेश होणार आहे. जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीला दोन जागांचे नुकसान सहन करावे लागले आहे. या अगोदर सात सदस्य होते. मात्र, या पोटनिडणुकीत पाच जागांवर समाधान मानावे लागले असून याचा फायदा शिवसेनेला झाला असून दोन जागा वाढल्या आहेत.

त्यामुळे जरी जिल्हा परिषदेवर सेना, राष्ट्रवादीची ताकत असली तरी मात्र, यात राष्ट्रवादीच्या सदस्यांची संख्या घटली आहे. तर पंचायत समितीवर पालघर (९ ), वाडा, (१) वसई (२), डहाणू, (२) या १४ जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत वसईत बहुजन विकास आघाडीला तीन जागा मिळविण्यात यश आले तर सेना ५ ,भाजप ३ तर राष्ट्रवादी २ मनसे एक जागा मिळविण्यात यश आले आहे.

पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सेना, भाजप, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडीने प्रचाराला जोर दिला होता. राजकीय चढाओढ सुरु होती. मतदार राजा कोणाला कौल देणार याकडे मतदानानंतर लक्ष लागले असतानाच मतदारांनी 'दे धक्का' तंत्र वापरल्याने पराभवाला सामोरे जावे लागले.

वसई-विरार महापालिकेत बविआला फायदा

वसई तालुक्यात बहुजन विकास आघाडीने दोन जागा जिंकून विजय मिळवला असल्याने कार्यकर्त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे याचा सकरात्मक परिणाम येणाऱ्या वसई विरार शहर महापालिका निवडणुकीत होणार असल्याचे मत राजकीय वर्तुळातुन व्यक्त केले जात आहे. महापालिकेवर बविआची पकड आहे. परंतु, अनेक राजकीय पक्ष पालिकेत राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपड करू लागले आहेत. त्यातच वसई पंचायत समितीवर बविआने झेंडा रोवला असल्याने झाल्याने कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळणार आहे, असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT