Shrikant Shinde Sarkarnama
ठाणे

Shrikant Shinde : श्रीकांत शिंदेंचा हिंदू जागर सुरूच; आधी हरिनाम, आता भागवत कथा सप्ताह

Lok Sabha Election Kalyan Constituency : लोकसभा निवडणुकीसाठी हिंदू मतांची बेगमी सुरू केल्याची चर्चा

सरकारनामा ब्यूरो

भाग्यश्री प्रधान-आचार्य

Kalyan News :

कल्याणमधील अखंड हरिनाम सप्ताहानंतर आता डोंबिवलीत श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आहे आहे. ही दोन्ही ठिकाणे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या मतदारसंघातील असून धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून श्रीकांत शिंदे यांनी हिंदुत्वाचा जागर सुरू केल्याची चर्चा आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात मलंगगडाच्या पायथ्याशी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते. या हरिनाम सप्ताहाचे स्वागताध्यक्ष खासदार डॉ. श्रीकांत शिंदे होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मलंगगडमुक्ती (Malanggad) घोषणा केल्यामुळे अयोध्येत राम मंदिर आणि कल्याणमध्ये मलंगगड, याची चर्चा सुरू झाली होती.

आता शिंदेंच्या शिवसेनेने डोंबिवली पूर्वेत श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन केले आहे. हिंदुत्वाचा जागर सुरू ठेवत मतदारांना जोडून ठेवण्यासाठी भाजपबहुल असलेल्या डोंबिवलीत हा उपक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाला खासदार श्रीकांत शिंदे आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

लोकसभेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदे याच कल्याण लोकसभा मतदारसंघातून पुन्हा दिल्लीला जाण्यासाठी इच्छूक आहेत.

त्या दृष्टीने काही महिन्यांपासून ते पुन्हा मतदारसंघाशी कनेक्ट होत आहेत. मलंगगडच्या पायथ्याशी आजोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची चर्चा नंतरही होत राहिली. त्यात मलंगगडमुक्तीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली होती. त्यामुळे ते टिकेचे धनी देखील ठरले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांनी डोंबिवलीत श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम 13 जानेवारी ते 19 जानेवारी या कालावधीत होणार आहे. डोंबिवली पूर्वेकडील नेहरू मैदानात रोज सायंकाळी 6.30 वाजता कथा सुरू होणार आहे. श्रीमद् भागवत कथा प्रवचनकार गुरुदेव विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला स्वतः खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी सलग दुसरा धार्मिक कार्यक्रम आयोजित करून लोकसभा निवडणुकीसाठी हिंदू मतांची बेगमी करायला सुरुवात केल्याची चर्चा कल्याण लोकसभा मतदारसंघात सुरू आहे.

(Edited by Avinash Chandane)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT