Shiv Sena (UBT) Thane district chief Kedar Dighe reacting to unopposed wins in municipal elections, raising questions over the NOTA option and election process through a social media post. Sarkarnama
ठाणे

ShivSena UBT News : बिनविरोध निवडणुकीत आता तांत्रिक मुद्द्याची चर्चा : दिवंगत आनंद दिघेंच्या पुतण्याचे महत्त्वाच्या मुद्द्यावर बोट

Thane Municipal Election : ठाणे महापालिका निवडणुकीत उबाठा शिवसेनेचे केदार दिघे यांनी ईव्हीएमवर नोटा पर्याय असताना बिनविरोध निवड कशी, असा सवाल उपस्थित करत निवडणूक प्रक्रियेवर टीका केली.

राहुल क्षीरसागर

Thane Election News : ठाणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आता सुरु झाली असून राजकीय वातावरण देखील तापू लागले आहे. मात्र, यंदाच्या वर्षी राजकीय वातावरण एका वेगळ्या म्हणजेच बिनविरोध निवडीवरून अधिक तापले असल्याचे दिसून येत आहे. अशातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी एका ट्विटद्वारे निवडणूक प्रक्रियेवर आणि 'बिनविरोध' निवडून येणाऱ्या उमेदवारांवर बोचरी टीका केली आहे.

"जर ईव्हीएमवर 'नोटा'चा पर्याय असेल, तर बिनविरोध निवड कशी होऊ शकते?" असा सवाल दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी उपस्थित केला आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी यासह राज्यातील विविध महापालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवार बिनविरोध निवडणूक आले आहेत. या बिनविरोध निवडीवरून पालिकेची रणभूमी अधिकच तपाल्याचे दिसून येत आहे.

ठाणे महानगरपालिका निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अशा वेळी केदार दिघे यांनी थेट निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि 'बिनविरोध' निवडीच्या प्रक्रियेवर बोट ठेवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अशातच केदार दिघे यांनी एक 'एक्स' पोस्ट केली आहे.

यामध्ये अनेकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे घोषित केले जाते. मात्र, जर मतदारांना त्या उमेदवाराला नाकारण्याचा अधिकार नोटा असेल, तर केवळ एकच अर्ज शिल्लक राहिला तरी निवडणूक व्हायला हवी. असे सांगत काही मुद्दे मांडले.

दिघे यांनी मांडलेले मुख्य मुद्दे:

  •  नोटासमोर निवडणूक व्हावी: निवडणूक आयोगाने तथाकथित बिनविरोध उमेदवारांना थेट विजयी घोषित न करता, त्यांना 'नोटा' या पर्यायासमोर उभे करावे.

  •  मतदारांचा कौल महत्त्वाचा: किती मतदार त्या उमेदवाराच्या विरोधात आहेत, हे 'नोटा'च्या मतदानामुळे स्पष्ट होईल.

  •   पारदर्शक लोकशाही: बिनविरोध प्रक्रियेपेक्षा जनतेने दिलेला कौल अधिक महत्त्वाचा असून, यामुळे लोकशाही अधिक पारदर्शक होईल.

निवडणूक आयोगाने या तथाकथित बिनविरोध लोकांना नोटा बटण समोर उभे करावे. किती मतदार यांना विरोध करतात हे कळेल आणि लोकशाही अधिक पारदर्शक होईल.

- केदार दिघे, ठाणे जिल्हाप्रमुख (शिवसेना उबाठा)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT