Eknath Shinde, Uddhav Thackeray Sarkarnama
ठाणे

Uddhav Thackeray News : एकनाथ शिंदेंच्या टीकेवर ठाकरे गटाचं प्रत्युत्तर, थेट शिंदेंच्या देशभक्तीवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह

Pankaj Rodekar

Eknath Shinde On Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी (१७ मार्च) शिवाजी पार्क मैदानामधील इंडिया आघाडीच्या मेळाव्यात भाषण केलं. भाषणाची सुरुवातीला ठाकरेंनी जे शब्द उच्चारले त्यावरून विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या (India Alliance) मेळाव्यात भाषणाची सुरुवात 'माझ्या देशभक्त, देशप्रेमी बांधवांनो आणि मातांनो अशी केली.’ मात्र,  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपल्या भाषणाची सुरुवात नेहमी, 'माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो' अशी करतात. पण कालच्या सभेत त्यांनी हिंदू हा शब्द उच्चारला नाही. त्यामुळे त्यांनी आपली विचारधारा सोडल्याची टीका करत आहेत.

याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही ठाकरेंनीवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे आपल्या भाषणाची सुरुवात नेहमी, 'माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो' अशी करतात. पण कालच्या भाषणात त्यांनी हिंदू शब्द उच्चारला नाही.  यावरूनच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाळासाहेबांचे विचार, त्यांचं धोरण, विचारधारा सोडून दिल्याचं दिसून आलं. यामुळेच आम्हाला त्यांची साथ सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला, असं शिंदे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकनाथ शिंदेंच्या याच टीकेला आता, ठाकरे गटाचे ठाणे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. घाडीगावकर यांनी एक्सवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे देशभक्त नाहीक का? असा सवाल उपस्थित केला आहे.

त्यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलं आहे, “उद्धव साहेब शिवतीर्थावरून संपूर्ण देशाला संबोधित करताना म्हणाले, ‘जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो आणि मातांनो’ या वाक्याचा सार्थ अभिमान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनाही वाटला असेल. देश संकटात असताना, सामान्य माणसांवर अन्याय होत असताना, भारतमाता पुन्हा गुलामगिरीत ढकलण्याचे षडयंत्र सुरू असताना, आपला मुलगा देशाला दिशा दाखवतो, देशातील देशभक्तांना शिवाजी पार्कमधून (Shivaji Park) संबोधित करत आहे, याचा अभिमान बाळासाहेबांनाही वाटला असेल. पण लाचार गद्दारांना ‘देशभक्त बांधव’ हा शब्द का खटकला? शिंदे देशभक्त नाहीत का?” ते देशभक्त आहेत की नाहीत, हे त्यांनी जाहीर करावं."

मोदीभक्त ’देशभक्त‘ नाही का?

दरम्यान, सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंविरोधात भाजप (BJP) समर्थकांनी पोस्ट शेअर करताच. उद्धव ठाकरेंनीही या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या एक्स अकाउंटवरून ठाकरे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं. “मी काल माझ्या भाषणाची सुरुवात ‘माझ्या देशभक्त, देशप्रेमी बांधवांनो‘, अशी केल्यावर मोदीभक्तांनी माझ्यावर टीका केली. मला मोदीभक्तांना विचारायचंय, तुम्ही ’देशभक्त‘ नाही का?” असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

(Edited By - Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT