ravindra-thorat
ravindra-thorat 
अधिकारी

कामावर असतानाच हृदयविकाराचा धक्का : पोलिस उपअधीक्षक थोरतांचा मृत्यू

सरकारनामा ब्यूरो

उस्मानाबाद : येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असलेले उपअधीक्षक रवींद्र भारत थोरात यांचे सोमवारी (ता. 13) रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास सोलापूर येथे निधन झाले.

सोमवारी कार्यालयात काम करीत असताना सायंकाळी सहाच्या सुमारास छातीमध्ये तीव्र वेदना होऊ लागल्याने त्यांना शहरातील दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात पुढील उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ते उस्मानाबाद तालुक्‍यातील कौडगाव येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.

कामकाजावर असताना हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची ही गेल्या दहा दिवसांतील ही दुसरी घटना आहे. या आधी पालघर येथे पोलिसांची क्रिकेट मॅच सुरू असताना एका पोलिस निरीक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT