Parbhani ASP Nitin Bagate Played Band with Children
Parbhani ASP Nitin Bagate Played Band with Children 
अधिकारी

परभणीचे 'एएसपी' नितीन बगाटे मुलांसोबत वाद्य वाजविण्यात रंगले...

गणेश पांडे

परभणी : पोलिसांना देखील मन असते, त्यांना देखील भावना असतात, याची अनेक उदाहरणे समोर येतात. परंतू पोलिसांमधील हा मृदु स्वभाव कुणाला सहसा दिसत नाही. लांबूनच 'पोलिस मामा जय हिंद या वाक्यापुरताच पोलिसांशी संपर्क येणाऱ्या लहान मुलांना चक्क पोलिस अधिकाऱ्यासोबत बॅन्ड वाजविण्यास मिळाला. परभणीचे सहायक पोलिस अधिक्षक नितीन बगाटे हे देखील शालेय मुलांसोबत वाद्य वाजविण्यात रंगले. थोड्या काळासाठी का होईना मुलांच्या मनातील पोलिसांची भिती गेली व श्री. बगाटे देखील बालपणात रंगून गेले.

परभणी पोलिस दलाच्यावतीने 'रायझिंग डे' सप्ताह सुरु आहे. या निमित्ताने दररोज पोलिस सर्वसामान्य नागरीकांशी संपर्क वाढवित आहेत. पोलिसांबद्दलची माहिती दिली जात आहे. पोलिस खाते अधिक व्यापक स्वरुपात सर्वसामान्याशी जोडले जावे हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. परभणीत मंगळवारी (ता. ७) जिल्हा पोलिस परेड मैदानावर पोलिसांचे पथसंचलन पार पडले. हे पथसंचलन पाहण्यासाठी शहरातील शालेय विद्यार्थांना आमंत्रित करण्यात आले होते. आता पोलिसांचा कार्यक्रम म्हटल्यानंतर शालेय मुलांना खरे आकर्षण असते ते त्यांच्या बंदुकीबददल. मग काय खास मुलांसाठी पोलिसांच्या शस्त्रांचे प्रदर्शन देखील भरविण्यात आले. 

संपूर्ण कार्यक्रम संपल्यानंतर शालेय विद्यार्थांनी पोलिस बॅन्ड पथकाची भेट घेतली. त्यावेळी त्या ठिकाणी परभणीचे सहायक पोलिस अधिक्षक नितीन बगाटे हे देखील उपस्थित होते. मुलांची उत्स्कुता पाहून श्री. बगाटे हे देखील बालपणात हरवून गेले. मुलांनो तुम्हाला बॅन्ड वाजवायचा आहे का, असे विचारत त्यांनी मुलांच्या हातात वाद्ये दिली. स्वतःही मोठा ढोल घेवून मुलांच्या तालात मिसळून ताल देण्यास सुरुवात केली. प्रशासनातील उच्च अधिकारी मुलांमध्ये रममाण झाल्याचे पाहून इतर अधिकारी व कर्मचारी देखील हा प्रसंग कुतूहलाने पाहत होते.

मला लहान मुलांची निरागता आवडते

मला लहान मुले खुप आवडतात, त्यांची निरागसता मला अधिकच आकर्षित करते. त्यांच्या सोबत काही काळ घालविल्याने ताण तणाव कमी होतो, असे सहायक पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT