Parner Tehsildar Meeting Anna Hazare
Parner Tehsildar Meeting Anna Hazare 
अधिकारी

गावागावांत घुमताहेत तहसीलदार देवरेंच्या ध्वनिफिती

सरकारनामा ब्युरो

राळेगणसिद्धी : संसर्गजन्य कोरोना विषाणुबद्दल लोकशिक्षण व जनजागृती करण्यासाठी पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी तयार केलेल्या सात ध्वनिफिती पारनेर तालुका नव्हे, तर राज्यात सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल झाल्या आहेत. राळेगणसिध्दी येथे रोज सार्वजनिक जागेवरून लाऊडस्पीकरवर ध्वनिफितीद्वारे लोकजागृती केली जात आहे. 

कोरोना विषाणुमुळे जगभरातील बहुतेक देश संकटात सापडले आहेत. अमेरिका, चीन व युरोपातील अनेक देशांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानंतर मार्च महिन्यात राज्यात व देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने लॉकडाऊन, जनता कर्फ्यु, संचारबंदी असे उपाय केले जात आहेत. 

तहसीलदार देवरे यांनीही  संसर्गजन्य कोरोना आजार कशामुळे होतो, त्याची लक्षणे काय आहेत, आजारावर आरोग्य विभागाच्या उपाययोजना काय आहेत, कोरोना टाळण्यासाठी काय पथ्ये पाळावीत, कर्फ्यु , लॉक डाउन, संचारबंदी म्हणजे काय याबाबत ध्वनिफिती तयार करून सोशल मीडियावर टाकल्या. त्याद्वारे अतिशय  लोकशिक्षण व जनजागृती घडत आहे.

हजारे यांनी केले कौतुक

राळेगणसिद्धी येथे दररोज संत यादवबाबा मंदिरातील लाऊडस्पीकरवर या ध्वनिफितीद्वारे जनजागृती केली जात आहे. तहसीलदार देवरे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांना मास्क व सॅनिटायझर भेट देत, कोरोना जनजागृतीची माहिती दिली. त्याचे हजारे यांनी कौतुक केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT