Rtd IAS प्रभाकर देशमुखांची माणमध्ये "चळवळ'! 
Rtd IAS प्रभाकर देशमुखांची माणमध्ये "चळवळ'!  
अधिकारी

Rtd IAS प्रभाकर देशमुखांची माणमध्ये "चळवळ'! 

उमेश बांबरे

सातारा : सेवानिवृत्त आयएएस अधिकारी, माणचे सुपूत्र प्रभाकर देशमुख यांनी सामाजिक कार्यातून धडाकेबाज काम सुरू केले आहे. वृक्ष माझा सखा चळवळ, जलसंधारण, कौशल्य विकास आणि क्रीडा या चार विभागांवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. ही बांधणी त्यांना आगामी काळात राजकारणात फायदेशीर ठरणार आहे. 

देशमुख हे सेवानिवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश करणार, याबाबत सर्वांना उत्सुकता होती. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमास सर्व पक्षातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत दिले होते. राज्य शासनातील मंत्र्यांनी त्यांना राज्य पातळीवरील कमिटीत काम करण्याचे आवाहन केले होते. प्रत्यक्षात ते माण तालुक्‍यात आपल्या गावी लोधवड्याला आले. त्यांनी "वृक्ष माझा सखा...' ही मोहिम हाती घेतली आहे. 

या मोहिमेत शाळा, गण आणि तालुकास्तरावर झाडे लावणे व ती वर्षभर जतन करण्याची जबाबदारी प्रत्येकावर देण्यात आली आहे. तालुका व गणनिहाय समन्वयक नेमले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावून ते वर्षभर जतन करायचे आहे. एक वर्षानंतर प्रत्येक शाळांमध्ये पहिले तीन क्रमांक काढून विद्यार्थ्यांना बक्षिस दिले जाणार आहे. शाळांसाठी स्वतंत्र बक्षिसे आहेत. तालुकानिहाय काम करणाऱ्या पहिल्या पाच जणांना बक्षिस दिले जाणार आहे. पध्दतीने जलसंधारणात काम करणारी गावे व व्यक्तींसाठी तसेच युवक युवतींसाठी कौशल्य विकास आणि क्रीडा क्षेत्रातही त्यांनी काम सुरु केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT