agitation to save saarathi
agitation to save saarathi  
अधिकारी

`मराठा समाजासाठीच्या `सारथी`ला नख लागू देणार नाही...`

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राज्यात सत्ताबदल झाल्याचा नकारात्मक परिणाम मराठा आणि ओबीसी समाजासाठी सुरू केलेल्या योजनांवर पडत असल्याचा आक्षेप आता घेण्यात येत असून मराठा युवकांसाठी सुरू केलेली सारथी ही संस्था बंदी पाडण्याचे कारस्थान नव्या सरकारमधील लोक करत असल्याची टीका करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात मांडण्यातही सरकार कुचराई करत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.

महाराष्ट्रात 'छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (सारथी)' ही मराठा-कुणबी व कुणबी-मराठा समाजातील मुला-मुलींच्या संशोधन आणि प्रशिक्षणाच्या कल्याण यासाठी स्थापन झालेली संस्था आहे. तर ओबीसी समाजासाठी महात्मा ज्योतिराव फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन झाली आहे.

फडणवीस सरकारच्या काळामध्ये 'सारथी'ची स्थापना झालेली असताना सुशिक्षित बेरोजगार परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये हे कौशल्य सिद्ध करणाऱ्या मुलांसाठी विविध पद आणि स्पर्धा परीक्षेसाठी कौशल्य पूर्ण मार्गदर्शन शिबिर आयोजित केले.  डि. आर. परिहार साहेबां सारखे उत्तम अधिकारी महाराष्ट्राला व संस्थेला लाभले. मात्र त्यांनाच संस्थेतून काढण्यासाठी कट रचल्याचा आरोप करण्यात येत आहे.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सारथी संस्थेत भेट देताना तेथे परिहार यांचा अवमान केल्याचा आरोप ब्रिगेडचे प्रशांत धुमाळ यांनी केला. सरकारने 'सारथी' संस्थेचा स्वतंत्र स्वायत्त दर्जा कमी करू नये व संस्थेला मिळणारे अनुदान खंड बंद करू नये. आरक्षणासाठी 42 तरुण हुतात्मा झाले तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळाले. 'सारथी' व 'महाज्योती' वाचवण्यासाठी रक्ताचे पाट वाहतील, असा ब्रिगेडने इशारा दिला आहे.

`सारथी`चे व्यवस्थापकीय संचालक डी. आर. परिहार हे संवेदनशील व कार्यक्षम अधिकारी आहेत. म्हणूनच नऊ महिन्यांच्या सारथी संस्थेने चांगसे काम केले. त्यांनी उत्तम व अभिनंदनीय काम केले आहे. अजून 'महाज्योती' सुरू व्हायची आहे. हे सुप्रिया सुळे यांनी गोंधळ घालून जाणीवपूर्वक श्री. परिहारांना टार्गेट करून एक मोठ्या विरोधी वर्गाचं समर्थन केल्याचे पत्रकात म्हटले आहे.

मराठा महासंघाचे राजेंद्र कोंढरे यांनीही याबाबत आमदारांना निवेदने दिली असून सारथीच्या सर्व संचालकांचे म्हणणे ऐकून सरकारने वस्तुस्थिती समजून घ्यावी, अशी मागणी केली आहे. अनेक लोकप्रतिनिधी हे चुकीच्या माहितीच्या आधारे बोलत आहेत. सरकारमधील काही मंत्री हे मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या कटाला बळी पडत आहेत. मराठा समाजाच्या तरुणांसाठी ही संस्था महत्त्वाची आहे. काही झारीतील शुक्राचार्य विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळत आहेत. संस्थेला तातडीने सावरण्यासाठी सरकारने मदत करणे गरजेचे असल्याचे कोंढरे यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT