Prakash Ambedkar
Prakash Ambedkar Sarkarnama
अकोला

अकोला : ४ जागा जिंकून वंचितने बाजी मारली

Sampat Devgire

अकोला : अकोला तालुक्यातील सात जिल्हा परिषदेच्या जागांसाठी अटीतटीच्या लढतीत वंचित बहुजन आघाडीने सात पैकी चार जागा जिंकल्या. त्यामुळे त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत आघाडी घेतली आहे.

अकोला तालुक्यातील सात गटांचे निकाल असे, अंदुरा गट- मीना बावणे, शिर्ला गट- सुनील फाटकर, देगाव गट- राम गव्हाणकर आणि घुसर गट- शंकर इंगळे हे वंचित बहुजन आघाडीचे चार सदस्य विजयी झाले. या चारही ठिकाणी या उमेदवारांना सुरवातीपासून आघाडी होती. त्यांची लढत महाविकास आघाडीचे घटक असलेल्या पक्षांच्या उमेदवारांशी होती.

या तालुक्यात लाखपूरी गट - सम्राट डोंगरदेव (अपक्ष), अकोलखेड गट- जगन निचळ (शिवसेना) आणि दगडपारवा गट- सुमान गावंडे (राष्ट्रवादी काँग्रेस) हे तीघे विजयी झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT