Bacchu Kadu
Bacchu Kadu Sarkarnama
अकोला

दिव्यांगाच्या मदतीसाठी बच्चू कडुंचे सहकारी अधिकारी चक्क पायरीवर बसले...

मनोज भिवगडे

अकोला : राज्यमंत्री बच्चू कडू देशभर ओळखले जातात ते त्यांच्या वैविध्यपूर्ण आंदोलनांसाठी. एकट्याच्या बळावर त्यांनी प्रहार संघटना उभी केली आहे. सामान्य कार्यकर्ता ते राज्यमंत्री असा त्यांचा आजवरचा प्रवास राहिलेला आहे. सोबतच त्यांनी गोरगरीब व दिव्यांगांच्या सेवेचा वसा जोपासला आहे. त्यांचे सहकारीही त्यांचा हा वसा पुढे नेत आहेत. पालकमंत्री बच्चू कडू यांचे स्वीय सहायक दीपक ठाकरे यांनी एका दिव्यांगांच्या मदतीसाठी कार्यालयातून बाहेर येत थेट पायरीवर बसून विचारपूस केली.

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री बच्चू कडू यांचे कार्यालय आहे. या कार्यालयात नेहमी नागरिकांची वर्दळ सुरू असते. कुणी शासकीय कामातील अडचणी सोडवून घेण्यासाठी तर कुणी आरोग्याच्या तक्रारी घेऊन येतात. बच्चूभाऊंकडून मदतीची अपेक्षा घेऊन अनेक दिव्यांगही त्यांच्या कार्यालयात दररोज येत-जात असतात. काल सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास अकोला शहरातील कृष्णा बोराडे नामक दिव्यांग त्यांच्या कार्यालयाबाहेर आला. दोन्ही पाय नाही व एक हातही नसलेला हा दिव्यांग कार्यालयापर्यंत पाटीवरील गाडीवर वसून आला.

बच्चूभाऊंकडून एखादी तीन चाकी सायकल मिळाली तर स्वाभिमानाने पोटासाठी काही करता येईल, या अपेक्षेने आलेल्या दिव्यांगाला कार्यालयातील रॅम्पवरूनही चढता आले नाही. त्यामुळे तो कार्यालयाच्या पायरीजवळच बसला. ही माहिती बच्चू कडू यांचे स्वीय सहायक दीपक ठाकरे यांना मिळताच त्यांनी कार्यालयाबाहेर येऊन त्याची विचारपूस केली. दिव्यांगाला मान वरून करून बोलण्यासाठी त्रास होत असल्याचे बघून त्यांनी थेट पायरीवर बसून त्याची विचारपूस केली.

आस्थेने विचारपूस केल्यानंतर त्याला हवी असलेली मदत देण्यासाठी शासकीय पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. मंत्र्यांच्या कार्यालयात मदतीसाठी येणाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन कुणापासूनही लपून राहिलेला नाही. मात्र, बच्चू कडू यांनी राजकारणात येण्यापूर्वीपासून जोपासलेला सेवेचा वसा त्यांच्या राज्यमंत्री होण्यानंतरही त्यांनी जोपासला, तसा तो त्यांच्या अधिनस्त काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडूनही जोपासला जाईल, याची काळजी त्यांनी घेतल्याचे या घटनेतून दिसून येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT