बुलडाणा : जिल्हा परिषदेचे सदस्य आणि अध्यक्षपदाच्या कार्यकाळात कधी कर्मचाऱ्यांच्या बदलीच्या भानगडीत न पडणारे अखिल भारतीय कॉंग्रेसचे सचिव आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची बदली मध्यप्रदेशात झाल्याची जिल्हाभरात चर्चा रंगली आहे.
आमदार सपकाळ यांची राजकीय कारकीर्द जिल्हापरिषदेपासून सुरू झाली. आधी सदस्य नंतर अध्यक्ष, नंतर राहूल ब्रिगेडमध्ये सक्रिय, सध्या आमदार आणि अखिल भारतीय कॉंग्रेसचे सचिव असा त्यांचा चढता राजकीय आलेख आहे.
पण आता त्यांची बदली हे काय प्रकरण आहे? असा प्रश्न पडणे सहाजिकच आहे. तर थेट विषय असा की आमदार सपकाळ यांच्यावर गुजरातचे प्रभारी म्हणून जबाबदारी होती. त्यांनी देशभरात असलेल्या मोदी लाटेविरोधात गुजरातमध्ये रान उठवले.
ज्या प्रदेशातून ते काम पहायचे तेथे कॉंग्रेसला चांगले यश मिळाले. त्यांच्या या कामाची दखल घेऊन पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांनी त्यांच्या खांद्यावर मध्यप्रदेशची जबाबदारी दिली आहे. सोबतीला वर्षा गायकवाड व शुधांशू त्रिपाठीदेखिल आहेत.
त्यांना दिलेल्या नियुक्तिपत्रात म्हटले आहे, की गुजरातमधील त्यांची कामगिरी पाहून मध्यप्रदेशची जबाबदारी दिली आहे. या ठिकाणी देखिल पक्ष संघटन व निवडणूकीच्या दृष्टीने कामाला लागण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेतील कार्यकाळात श्री. सपकाळ कधी बदलीच्या भानगडीत पडले नाही. पण आता खुद्द पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांनीच त्यांच्या बदलीचे आदेश काढल्याने त्यांना आता गुजरातकडून मध्यप्रदेशाकडे प्रयाण करावे लागणार आहे. यासाठी कॉंग्रेसच्या अनेक दिग्गजांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.