Rajendra-Shingane-Buldhana
Rajendra-Shingane-Buldhana 
अकोला

राजेंद्र शिंगणेंच्या आघाडीच्या गुगलीने कॉंग्रेसच्या इच्छुकांचा हिरमोड

आशिष ठाकरे

बुलडाणा : राज्यात शासनाच्या सध्याच्या धोरणामुळे शेतकऱ्यांसह बेरोजगार आणि नोकरदारही पेचात पडत असून, हाच वर्ग येणाऱ्या काळात पुन्हा गतवैभव प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही. सत्तेत बसण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसमध्ये आघाडी होणार असल्याचे सूतोवाच माजी राज्यमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापन दिनी केल्याने कॉंग्रेसमधील इच्छुकांचा मात्र हिरमोड झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

शासनाच्या विरोधात शेतकरी, मजूर, बेरोजगारांसह सर्वसामान्य जनतेच्या समस्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने राज्यात आंदोलने करून सत्ताधारी भाजपच्या नाकीनऊ आणले आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी व कॉंग्रेसची आघाडी होणार असून सत्ताधारी भाजपला खाली खेचण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात केले. त्यांच्या या विधानानंतर बुलडाणा जिल्ह्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने स्वतंत्र निवडणूक लढण्यासाठी मैदान तयार करत असलेल्या काही इच्छुक उमेदवारांचा मोठा हिरमोड झाला आहे. 

जिल्ह्यातील बुलडाणा, मलकापूर, जळगाव जामोद विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी निवडणुकीची स्वबळाची तयारी सुरू केली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काही पक्षातील इच्छुकांनी कोलांटउड्या मारत पक्षबदल केले आहेत. मात्र, आघाडी झाल्यास ह्या जागा कॉंग्रेस की राष्ट्रवादीला सुटतात? याची इच्चुकांमध्ये धाकधुक वाढली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT