अकोला

बाळापूर पतसंस्था गैरव्यवहार - माजी अामदार नातीकाेद्दीन खतीब यांंच्या संपत्तीची चाैकशी

बाळापुर नागरी पतसंस्थेत केलेल्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी अामदार ॲड. नातीकाेद्दीन खतीब यांच्यासह 13 संचालकांच्या संपत्तीची चाैकशी सुरू झाली अाहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाकडून अकाेला जिल्हा पाेलिस अधिक्षक कार्यालयातील अार्थिक गुन्हे शाखेला याबाबतची माहिती पाठविण्यात अाली अाहे.

सरकारनामा ब्युराे

अकाेला : बाळापुर नागरी पतसंस्थेत केलेल्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी अामदार ॲड. नातीकाेद्दीन खतीब यांच्यासह 13 संचालकांच्या संपत्तीची चाैकशी सुरू झाली अाहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाकडून अकाेला जिल्हा पाेलिस अधिक्षक कार्यालयातील अार्थिक गुन्हे शाखेला याबाबतची माहिती पाठविण्यात अाली अाहे.

या माहितीचा अभ्यास करून ॲड. खतीब यांच्यासह 13 संचालकांच्या गेल्या 23 वर्षात वाढलेल्या संपत्तीचा शाेध घेण्यात येणार असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली अाहे. बाळापुर नागरी पतसंस्थेच्या ठेवीदाराच्या रक्कमेचा घाेटाळा केल्याचे प्रकरण सध्या गाजत अाहे. या गैरव्यवहार प्रकरणी पराते यांच्या तक्रारीवरून बाळापुर पाेलिसांनी पतसंस्थेचे अध्यक्ष असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी अामदार ॲड. नातीकाेद्दीब खतीब यांच्यासह पराते यांच्यासह पतसंस्थेचे संचालक शाम सखाराम शेगोकार, रजीया बेगम सै.नातीकोद्दीन खतीब, अॅड.सै. हमीदोद्दीन सै. जमीद्दोदीन, नंदकिशोर दामोदर पंचभाई, मो. हनीफ अब्दुल मुनाफ, निजामोद्दीन शफीद्दीन, गफारली रेहमानजी रंगारी, सै. मुजीबुर रहेमान सै. हबीब, निर्मलाबाई श्रीकृष्ण उमाळे, शे. महेमुद शे. हसन, शेख मुनीर शेख वजीर, शेख इब्राहीम या पदाधिकारी व संचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

या गैरव्यवहार प्रकरणात पुणे येथील महानिबंधकांनी राज्यातील सर्व जिल्ह्यातील दुय्यम निबंधकांना पत्र पाठवून अॅड. खतीब यांच्यासह 13 संचालकांच्या नावे असलेली स्थावर मालमत्ता विक्रीवर प्रतिबंध घालावा, असे आदेश यापूर्वीच दिले होते. अाता त्यांच्या संपत्तीची चाैकशी सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली अाहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT