Dr-Sanjay-Kute-MLA
Dr-Sanjay-Kute-MLA 
अकोला

मंत्री मंडळ विस्तारात डॉ. संजय कुटे फिक्स !

सरकारनामा

बुलडाणा : केंद्रात भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता भाजपने राज्यात  होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रित करण्यास सुरवात केली आहे. त्या दृष्टिकोनातून राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला वर्षभरापूर्वी पासून विस्तार आता 14 जूनला होणार असल्याचे जवळपास निश्चित करण्यात आले आहे. 

यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदार संघाचे भाजप प्रदेश सरचिटणीस डॉ. संजय श्रीराम कुटे यांचे नाव फिक्स झाले असल्याचे संकेत मिळत आहे. 

गेल्या वर्ष दीड वर्षांपासून लांबणीवर असलेला राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आता 14 जूनला होण्याचा मुहूर्त मिळाला असल्याचे खात्रीपूर्वक वृत्त हाती आले आहे. भाजप सरकार माध्यमातून होणार्‍या या अखेरच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठीभाजपाआणि शिवसेनेचे अनेक आमदार उत्सुक आहेत. 

 काँग्रेस, राष्ट्रवादीच्या चार बंडखोर नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मंगळवारी जवळपास अर्धा तास चर्चा केल्याने तसेच तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणूक पाहता विस्तार नाट्याला पूर्णविराम लावीत विस्ताराचा मुहूर्त काढण्यात आल्याचे कळते.  एक किंवा दोन मंत्रिपद शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहे. तर, भाजपला तीन किंवा चार मंत्रिपद मिळणार आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारात एकूण सात जागा भरल्या जातील. 

त्यासाठी शिवसेना,भाजपा आमदारांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. कॅबिनेट विस्तारात भाजप आमदार आशिष शेलार, संजय कुटे, अतुल सावे, प्रशांत बंब यांना स्थान मिळणार असल्याचे संकेत आहे. परंतु, याबाबत प्रदेश कार्यालय तसेच काही प्रदेश प्रवक्त्यांसोबत संपर्क केला असता त्यांनी निर्णय झाल्याच्या बाबीला दुजोरा दिला . पण  नेमकी कोणाची वर्णी लागणार याबाबत अधिकृतरीत्या माहिती देण्याचे टाळले आहे. तर, मंत्री मंडळ विस्तार आणि कृषी मंत्रीपदासोबत समावेश निश्‍चिती संदर्भात भाजप प्रदेश सरचिटणीस तथा आमदार डॉ. संजय कुटे यांना संपर्क केला असता, ते व्यस्त असल्यामुळे अधिकृतरीत्या दुजोरा मिळू शकला नाही. 

 भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या अचानक निधनानंतर जिल्ह्यात डॉ. संजय कुटे यांचे नाव अग्रस्थानी आले. मात्र, मध्यतंरी विस्तार लांबणीवर पडल्यामुळे आशा पुन्हा अडगळीला पडल्यात. परंतु, आता मंत्री मंडळाच्या शेवटच्या विस्तारामध्ये दिवंगत कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचा शेतकरी हिताचा वारसा पुढे नेण्याचे काम एकत्र राधाकृष्ण विखे  किंवा डॉ. संजय कुटे करणार असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष: म्हणजे राजकारण येण्यासाठी भाऊसाहेब फुंडकर यांचे पाठबळ डॉ. कुटेंना नेहमीच लाभले असल्याचे ते सार्वजनिकरीत्या आजही सांगत असतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT