अकोला

बाळापूर पतसंस्था गैरव्यवहार : माजी आमदार नातीकाेद्दीन खतीब यांच्यासह 13 संचालकांच्या मालमत्तांवर टाच

बाळापूर नागरी पतसंस्थेत काेट्यवधीचा घाेटाळा केल्याप्रकरणी काँग्रेसच्या 'एअायसीसी'चे प्रतिनिधी माजी अामदार ॲड. नातीकाेद्दीन खतीब यांच्यासह पतसंस्थेच्या सर्व संचालकांच्या संपत्तीवर टाच अाली अाहे. या सर्व संचालकांचे बॅंक खाते सील करण्यात अाले असून त्यांच्या नावे असलेल्या स्थावर मालमत्तांचे विक्रीवरही प्रतिबंध करण्यात अाला अाहे

सरकारनामा ब्युराे

अकाेला : बाळापूर नागरी पतसंस्थेत काेट्यवधीचा घाेटाळा केल्याप्रकरणी काँग्रेसच्या 'एअायसीसी'चे प्रतिनिधी माजी अामदार ॲड. नातीकाेद्दीन खतीब यांच्यासह पतसंस्थेच्या सर्व संचालकांच्या संपत्तीवर टाच अाली अाहे. या सर्व संचालकांचे बॅंक खाते सील करण्यात अाले असून त्यांच्या नावे असलेल्या स्थावर मालमत्तांचे विक्रीवरही प्रतिबंध करण्यात अाला अाहे. 

बाळापूर नागरी सहकारी पतसंस्थेत 700 ठेवीदारांनी गुंतवणूक केली आहे. माजी आमदार ॲड. नातीकाेद्दीन खतीब हे या पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत. ठेवीदारांनी आकर्षक व्याजदराच्या आमिषाला बळी पडून पतसंस्थेत ठेवी ठेवल्या होत्या. ठेवींच्या रकमेतून दुसऱ्याच्या नावाने परस्पर कर्ज वितरीत अध्यक्षांसह संचालकांनी दुरूपयोग केल्याचा आरोप तक्रारदार रामदास श्रीराम पराते यांनी केला होता. ठेवीदारांच्या ठेवींवर पतसंस्थेने कोणतेही व्याज दिले नाही तसेच बचत खात्यातही व्याजाची रक्कम जमा केली नाही. मात्र, व्याज दिल्याच्या खोट्या नोंदी करण्यात आल्या आहेत. ठेवीदार पैसे व्याजासह परत मागण्यासाठी गेले असता त्यांना पतसंस्थेत पैसे नाहीत, कर्ज वसूलीनंतर देऊ असे खोटे आश्वासन पतसंस्थेकडून मिळाले. 

गुंतवणूकदारांची कुठलीही पूर्वपरवानगी न घेता त्यांच्या मुदत ठेवीच्या प्रमाणपत्रावर वेळोवळी मुदत वाढवून देण्यात आली, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पराते यांच्या तक्रारीवरून बाळापूर पोलिस ठाण्यात माजी आमदार तथा पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. नातिकोद्दीन खतीब, शाम शेगोकार, रजीया बेगम सै. नातीकोद्दीन खतीब, सै. हमिद्दोनी सै. जमीदोद्दीन, नंदकिशोर दामोधर पंचभाई, मो. हनीफ अब्दुल मुनाफ, निजामोद्दीन शफीद्दीन, गफारली रेहमानजी रंगारी, सै. मुजीबुर रहेमान सै. हबीब, निर्मलाताई श्रीकृष्ण उमाळे, शे. महेमूद शे. हसन, शे. मुनीर शेख व शेख वजीर, शेख इब्राहीम या पदाधिकारी व संचालकांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले अाहेत. 

या प्रकरणात अार्थिक गुन्हे शाखेने माजी अामदार खतीब यांच्यासह सर्व संचालकांच्या संपत्तीवर टाच अाणली असून त्यांचे बॅंक खाते सील केल्याने संचालकांचे धाबे दणाणले अाहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT