अकोला

'स्वाभिमानी' च्या कार्यकर्त्यांनी भिक मागून 420 रूपये पाठवले मुख्यमंत्र्यांना

सरकारनामा ब्युरो

खामगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने संग्रामपूर बसस्थानक ते तहसील कार्यालय पर्यंत मुख्यमंञ्यांच्या नावाने भीक मांगा आंदोलन करून भिक्षेत जमलेली 420 रूपयांची रक्कम मुख्यमंञ्याना तहसीलकार्यालयाच्या मार्फत पाठविली आहे. किडनीच्या आजाराने मृत्यु झालेल्या मृताच्या कुटुबांला दोन लाख रूपयाची आर्थिक मदत द्या, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.  

जळगाव संग्रामपूर व शेगाव तालुक्यातील खारपान पट्टा असून क्षारयुक्त पाण्यामुळे अनेक लोकांना किडनीचे आजार होऊन अनेक लोकांचे बळी गेले आहेत. अनेक जण किडनीच्या विकारामुळे मृत्युशी झुंज देत आहेत. परंतू, या गंभीर प्रश्नावर सरकार व प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. एका बाजूने गेल्या दहा वर्षापासून 140 गाव पाणी पुरवठा योजनेची चर्चा आहे. परंतू, काम अजूनही पूर्ण होत नाही. मग ही योजना जनतेला स्वच्छ पाणी प्यायला मिळण्यासाठी की ठेकेदारांना वाढीव कमीशन मिळण्यासाठी, असा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. 

सरकारचे या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार (ता. 16) स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेत्तूवात भिक मांगा आंदोलन करून जमा झालेली 420 रूपयांची रक्कम तहसिलकार्यालया मार्फंत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आली आहे. यावेळी किडनीच्या आजाराने मृत्यु झालेल्याच्या कुटूंबाला दोन लाख रूपयाची आर्थिक मदत द्या, प्रत्येक गावामधे पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा पूरवठा करा, संशयित किडनी रूग्णांना मोफत ऊपचार द्या, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर, रोषन देशमुख, उज्वल चोपडे, मोहन पाटील, न्यानेश्वर हागे, अंनता मानकर, संतोष दाणे, प्रविण येणकर, अतुल वानखडे, योगेश मूरूख, संतोष तायडे, प्रकाश मेहंगे,एकनाथ दूतोंडे, संतोष गाळकर,महम्मद शहा, योगेश तराळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT