MIM-Buldana
MIM-Buldana 
अकोला

बुलडाण्यातून मोहम्मद सज्जाद यांना एमआयएमची उमेदवारी 

आशिष ठाकरे

बुलडाणा :   बुलडाण्यातून मोहम्मद सज्जाद तर अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथून डॉ. रहेमान खान हाजी काले खान यांना उमेदवारी एमआयएमची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे . 

विशेष म्हणजे मोहम्मद सज्जाद यांच्या पत्नी नजमुन्नीजा मोहम्मद सज्जाद या भारिप- बहुजन महासंघातर्फे मधून थेट जनतेतून निवडून येत नगराध्यक्षपदावर विराजमान आहे. त्यामुळे पती एका पक्षात तर पत्नी दुसऱ्या पक्षात असे चित्र निर्माण झाले आहे . 

मुंबईसह, मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रात निवडक जागेवर उमेदवार एआयएमआयएमकडून देण्यात आले. दरम्यान, बुलडाण्यात वंचित बहुजन आघाडीवर लढण्यासाठी इच्छुक असलेले मोहम्मद सज्जाद यांना तिकीट मिळाले नसल्यामुळे त्यांनी एआयएमआयएमसेाबत जाण्याचे ठरविले. 

लोकसभा निवडणुकीत राज्यात वंचित बहुजन आघाडीचा फॉर्म्यूला तयार करत औरंगाबाद येथील दिग्गज नेत्याचा पराभव करत लोकसभेत एआयएमआयएमने धडक मारली होती . आता एमआयएमने  वंचितला बाजूला सारत एकटा चलो रे चा नारा दिला आहे  .  विधानसभा निवडणुकीत बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे उमेदवार देऊन वर्‍हाडात एन्ट्री केली आहे. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आज ही घोषणा केली . 
 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT