बुलडाणा: शिवसेनेने उमेदवारी नाकारलेल्या माजी आमदार विजयराज शिंदे यांना वंचित बहुजन आघाडीने शेवटच्या क्षणी एबी फॉर्म देऊन उमेदवारी दिली.
तिन वेळा आमदार राहिलेल्या माजी आमदार विजयराज शिंदे शिवसेनेच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते, मात्र सेनेने उपजिल्हाप्रमुख संजय गायकवाड यांना उमेदवारी दिली. त्यामूळे श्री शिंदे समर्थकांनी त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या नावाखाली निवडणुक लढवा असा आग्रह धरला होता.
राजकारणाचे सर्व डावपेच माहीती असलेल्या श्री शिंदे यांनी रात्रीतून आपले राजकीय चातुर्य पणाला लावत वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी मिळविली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही मिनिटांपूर्वी वंचितचे नेते अशोकभाऊ सोनोने यांनी श्री शिंदे यांना वंचित बहुजन आघाडीत प्रवेश देऊन त्यांना एबी फॉर्म दिला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सैनिकवरील झालेला अन्याय अखेर उमेदवारी देऊन दुसऱ्या बाळासाहेबानी दूर केला असल्याची भावना विजयराज शिंदे यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.