rajendra shingane
rajendra shingane 
अकोला

डॉ. राजेंद्र शिंगणेंच्या मंत्रीपदाची जिल्ह्याला अपेक्षा

अरुण जैन

बुलडाणा : राज्यातील बदलत्या राजकीय सत्ता समिकरणामध्ये शिवसेनेच्या सोबतीला आता राष्ट्रवादी काँग्रेस आल्याने राष्ट्रवादीचा हक्काचा, एकनिष्ठ, शरद पवारांशी जवळीक असलेला नेता म्हणजे डॉ.राजेंद्र शिंगणे. मंत्रीपदाचे अनेक अनुभव असलेल्या या नेत्याला पुन्हा मंत्रीमंडळात स्थान मिळेल अशी जिल्हावासीयांना अपेक्षा आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात मातृतिर्थ म्हणून ओळखल्या जाणार्‍या राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व डॉ.राजेंद्र शिंगणे पाचव्यांदा करीत आहेत. दरम्यानच्या काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक लोकसंग्रह असलेला दमदार नेता म्हणून स्थान मिळविलेले आहे. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवारांशीही त्यांची  जवळीक आहे. गेल्या 2014 च्या विधानसभेत ते निवडणूकीपासून दुर होते. 2019 ची लोकसभेची निवडणूक त्यांनी लढविली. मात्र, त्यामध्ये पराभव पत्कारावा लागला. सामान्य जनतेने 2019 च्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांना पुन्हा निवडून दिले. 

शिवाय विदर्भातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून आलेल्या दोघांपैकी ते एक आहेत. गेल्यावेळी भाजप-शिवसेना युतीच्या शासनामध्ये डॉ.संजय कुटे यांना शेवटच्या तीन महिन्यात का होईना परंतू मंत्रीपद मिळाले होते. त्यामुळे जिल्ह्याला हक्काचा माणूस मिळाला होता. ही कमतरता आता डॉ.शिंगणेंच्या रुपाने दुर होईल अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. 

अमरावती विभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार म्हणून ते निवडून आले आहेत. गेल्या 2014 च्या युती शासनाच्या काळात त्यांच्याकडे विदर्भ को ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशनचे अध्यक्षपद होते. जिल्हा सहकारी बँकेच्या निमित्ताने त्यांच्या सहकार विभागाचा अभ्यास आहे. याशिवाय आरोग्य खात्याचे मंत्री, महसूल खात्याचे राज्यमंत्री या जबाबदार्‍याही त्यांनी सांभाळलेल्या आहेत. नैसर्गीक आपत्ती, शेतकर्‍यांवरील संकटे, सर्वसामान्यांची सुख दुखे यामध्ये नेहमीच हिरीरीने सहभागी होणारा नेता  त्यांची ओळख आहे . घेवून त्यांना संधी देतील अशी अपेक्षा आहे.

गेल्या पाच वर्षाच्या काळात मोदी-फडणवीस लाट देशभरासह राज्यभरात होती. निवडणुकीच्या पुर्वी वर्षभरात तर याचा वेग सर्वाधिक होता. डॉ. शिंगणें यांचे  दिवंगत भाजप नेते भाऊसाहेब फुंडकर, तत्कालीन प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे या सर्वांशिच जवळचे संबंध होते. ते संबंध जोडून शिंगणे भाजपमध्ये जातील अशा अफवाही उठविल्या जात होत्या. मात्र, श्री. शिंगणे यांनी तसा कधी विचारही केला नाही. त्यामुळे त्यांच्या प्रामाणिकपणाचे व एकनिष्ठेचे फळ त्यांना निश्‍चितच मिळेल असे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT