Raj Thakray MNS
Raj Thakray MNS 
अकोला

अकोल्यात मनसेची टीम तयार, आता आव्हान कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याचे

मनोज भोईगडे

अकोला : कार्यकर्त्यांची वानवा असलेला पक्ष म्हणून मनसेची जिल्ह्यात ओळख आहे. अनेक वर्षांपासून काही मोजक्या चेहऱ्यांच्या मदतीने या पक्षाचे काम सुरू आहे. आता पदाधिकाऱ्यांचीही फळी अनुभवी झाली असून, पक्ष संघटनेचे काय महत्त्व आहे याची त्यांना चांगलीच जाणीव झाली आहे. 

मनसेचे पक्षसंघटन जिल्ह्यात मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्याकडे जातीने लक्ष देण्याची गरज आहे. काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष मोठा होऊ शकत नाही. त्यासाठी कार्यकर्ते आवश्यक आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्त्यांची फौज निर्माण करता येऊ शकते. त्यासाठी शहरासोबतच ग्रामीण भागातही मनसेचे कार्यकर्ते उभे झाले तरच हा पक्ष या जिल्ह्यात टिकू शकेल. 

अन्यथा गत काही वर्षात झालेली पक्षाची जिल्ह्यातील वाताहात यापुढेही कायम राहील अनेक वर्षांंपासून पक्षसंघटनेत काम काम करीत असताना पाठीशी आलेला अनुभव पणाला लावून मनसेला एक नवी ओळख निर्माण करून देण्याचे आव्हान नव्या पदाधिकाऱ्यांना पेलावे लागणार आहे. केवळ स्वार्थासाठी पक्षाचा वापर न करता पक्ष कसा मोठा होईल याकडे लक्ष दिले तरच मनसेला या जिल्ह्यात भवितव्य आहे. अन्यथा मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिलेली पदे त्यांच्यापुरतीच मर्यादित राहतील. त्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष द्यावे लागणार आहे.

पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना एकसंघ ठेवण्यासाठी नियमित उपक्रम राबविले जात नाही तोपर्यंत मनसे येथे मोठा होऊ शकणार नाही, याची जाणीव पदाधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे सातत्याने जनमाणसांमध्ये मिसळून त्यांच्या समस्यांचा ऊहापोह करीत राहणे, त्यांच्या समस्यांसाठी लढत राहणे, त्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची  तयारी ठेवावी लागले. विर्दभ दौरा करताना मनसे प्रमुख राज ठाकरे लवकरच अकोल्यात येणार आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना एक दिशा देऊन जातील अशी अपेक्षा केली जात आहे. 
अशी आय टीम मनसे
अकोला पूर्व आणि पश्चिम जिल्हा प्रमुख : पंकज साबळे
अकोला पूर्व शहर प्रमुख : आदित्य दामले
अकोला पश्चिम शहर प्रमुख : राकेश शर्मा
मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघ : रामा उंबरकर
अकोट आणि बाळापूर विधानसभा मतदार संघ : रवी फाटे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT