Tulja bhavani mandir News Sarkarnama
छत्रपती संभाजीनगर

तुळजाभवानी मंदिरातील प्राचीन नाणी गायब, व्यवस्थापकास अटक

पंचनाम्यात 71 नाण्यासह सोने चांदीच्या वस्तु गायब झाले असल्याचे दिसून आले.

सरकारनामा ब्युरो

तुळजापूर : तुळजा भवानी मंदीरातील प्राचीन नाणी गायब केल्याप्रकरणी मंदीर समितीचे तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांना सोमवारी ता.19 मध्यरात्री पोलीसांनी अटक केली आहे.

यासंदर्भात पोलीसांनी सांगितले की, तुळजा भवानी मंदीर समितीचे तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांनी ऐतिहासिक प्राचीन नाणी, 348 ग्रॅम सोने तसेच चांदीचा अपहार केला. (Ancient coins disappear from Tulja Bhavani temple, manager arrested) यासंदर्भात नाईकवाडी यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

मंदीर समितीच्या नाण्यांची नोंद 1980 पर्यत होती. तथापि 2005 ते 2018 मध्ये करण्यात (Tulja Bhvani Tempel, Tuljapur, Osmanabad) आलेल्या पंचनाम्यात 71 नाण्यासह सोने चांदीच्या वस्तु गायब झाले असल्याचे दिसून आले. यासंदर्भात नाईकवाडी यांना अटक करण्यात आली आहे.

यासंदर्भात येथील तुळजा भवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी त्यांचे वकील अॅड शिरीष कुलकर्णी यांच्या मार्फत लेखी तक्रार तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे केली होती.

यासंदर्भात चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्यानंतर पोलीसांत 13 सप्टेंबर 2020 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 9 मे 2019 रोजी लेखी तक्रार केली होती. नाईकवाडी हे कार्यरत असताना 29 नोव्हेंबर 2001 ते 30 नोव्हेंबर 2018 या कारकिर्दीत नाईकवाडी यांनी ऐतिहासिक नाणे तसेच सोन्या चांदीच्या वस्तु गायब केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अंजूम शेख करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT