Ahmedpur Chakur Constituency Congress NCP Candidate Babasaheb Patil Campaign 
छत्रपती संभाजीनगर

प्रचाराच्या धामधुमीत बाबासाहेब पाटलांकडून थोरामोठ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी

अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघात नऊ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत भाजप-शिवसेना युतीचे विनायकराव पाटील व कॉंग्रेस आघाडीचे बाबासाहेब पाटील यांच्यातच असल्याचे बोलले जाते. बाबासाहेब पाटील यांनी मतदारसंघातील गावागावात सभा घेण्याबरोबरच, वैयक्तिक गाठीभेटीलाही प्राधान्य दिले आहे

उदयकुमार जोशी

अहमदपूर : निवडणुक प्रचार आता शेवटच्या टप्यावर असल्याने उमेदवारांनी पदयात्रा आणि थेट गाठीभेटीवर भर दिला आहे. अहमदूपर-चाकूर विधानसभा मतदारसंघाचे कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांनी सध्या प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. यापुर्वी केलेली विकासकामे आणि भविष्यात करावयाच्या योजना यांची माहिती देत ते मतदारांना सामोरे जात आहेत. अगदी वृध्दांपासून तरुणांपर्यंत सगळ्याच मतदारांच्या अडचणी जाणून घेण्यावर पाटील यांनी भर दिला आहे.

अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघात नऊ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत भाजप-शिवसेना युतीचे विनायकराव पाटील व कॉंग्रेस आघाडीचे बाबासाहेब पाटील यांच्यातच असल्याचे बोलले जाते. बाबासाहेब पाटील यांनी मतदारसंघातील गावागावात सभा घेण्याबरोबरच, वैयक्तिक गाठीभेटीलाही प्राधान्य दिले आहे. प्रचाराची धामधुम, सभा, दौरे यामुळे उमेदवारांना उसंत नसली तरी एखाद्या गावात काहीकाळ निवांत क्षण त्यांच्या वाट्याला येत आहेत.

बाबासाहेब पाटील मतदारसंघातील मांडुरकी (ता.चाकूर) येथे प्रचारासाठी गेले होते. यावेळी तिथे घराच्या समोर बसलेल्या वृध्द आजींना पाहून पाटील त्यांच्या जवळ जाऊन बसले. आजींची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांच्याशी गप्पाही मारल्या. विजयासाठी शुभेच्छा देत आज्जीनी पाठीवरून मायेने हात फिरवल्यामुळे प्रचारातला शीण नाहीसा होऊन बाबासाहेबांनी काहीकाळ का होईना, निवांत क्षण अनुभवला. थोरामोठ्यांची आस्थेवाईकपणे चौकाशी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यामुळे बाबासाहेब पाटलांची मतदारसंघात चांगलीच चर्चा होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT