Ambadas_20Danve
Ambadas_20Danve 
छत्रपती संभाजीनगर

सगळ्या पक्षाचे सदस्य माझ्यावर प्रेम व्यक्त करतील :  अंबादास दानवे 

जगदीश पानसरे

औरंगाबादः एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून गेली अनेक वर्ष मी शिवसेनेत काम करतोय. या निमित्ताने माझे सगळ्याच राजकीय पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चांगले संबंध आहेत.

त्यामुळे एक उमेदवार म्हणून अगदी सगळ्या पक्षाच्या मतदार सदस्यांना भेटलो. यातून त्यांच्याशी माझे नाते तयार झाले आहे, त्यातून ते माझ्यावर प्रेम व्यक्त करतील असा विश्‍वास महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना व्यक्त केला. 

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी आज औरंगाबाद-जालना या दोन्ही जिल्ह्यात मतदान सुरू आहे. महायुतीचे अंबादास दानवे विरुध्द आघाडीचे बाबुराव कुलकर्णी असा हा सामना होत आहे. आपल्या विजयाबद्दल खात्री व्यक्त करतांना दानवे म्हणाले, महायुती व काही अपक्षांच्या पाठिंब्यामुळे आमचा आकडा 372 वर पोहचला आहे. याशिवाय इतर पक्षातील अनेक सदस्यांनी देखील मला पाठिंबा देऊ केला आहे. 

मतदान हे गुप्त पध्दतीने असल्यामुळे नेमकं कोणत्या पक्षाच्या सदस्याने मला मतदान केले हे मी सांगू शकणार नाही, पण एक ऐतिहासिक विजयाकडे महायुती वाटचाल करीत आहे एवढे मात्र निश्‍चित सांगू शकतो. निवडणुकीतील उमेदवार म्हणून मी शिवसेना, भाजप, रिपाइं, अपक्ष, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम या सगळ्याच पक्षाच्या सदस्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. 

एक सामान्य कार्यकर्ता मोठा होतोय म्हटल्यावर सगळ्यांनीच मला शुभेच्छा दिल्या आहेत. या दरम्यान, माझे या सदस्यांशी एक नाते निर्माण झाले आहे. आता या नात्यापोटी जर कुणी माझ्यावर प्रेम व्यक्त केले तर मी त्याला काही करू शकत नाही असा टोला देखील अंबादास दानवे यांनी यावेळी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT