Amol Kolhe Accepts Arjun Khotkar Demand
Amol Kolhe Accepts Arjun Khotkar Demand 
छत्रपती संभाजीनगर

मालिकेतील संभाजी महाराजांच्या छळाचा भाग वगळणार; अमोल कोल्हे यांचे अर्जुन खोतकर यांना आश्वासन

सरकारनामा ब्युरो

जालना : स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगजेबाने केलेला अनन्वित छळ या भागाचे प्रसारण वगळण्यात येईल असे आश्वासन या मालिकेत संभाजी महाराजांचे पात्र साकारणारे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी दिले आहे. 

शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी शिवजयंतीच्या दिनी 'छत्रपती संभाजी महाराजांचे हाल आम्ही कसे पाहावे' असे म्हणत संभाजी महाराजांच्या छळाचे चित्रीकरण व भाग मालिकेत दाखवू नये अशी मागणी केली होती.खोतकर यांच्या भूमिकेला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असल्याने यावरून अधिक वाद होऊ नये यासाठी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पुढाकार घेतला. 

यासंदर्भात माहिती देताना अर्जुन खोतकर म्हणाले, "अमोल कोल्हे यांचा नुकताच आपल्याला फोन आला होता. त्यांनी माझ्या भावनांचा आदर करत छत्रपती संभाजी महाराजांचा छळ हा भाग मालिकेतून वगळण्यासाठी आपण चॅनल तसेच निर्मात्यांशी बोलून कुणाच्याही भावना दुखावतील असा कुठलाही प्रसंग मालिकेत दाखवणार नसल्याचे आश्वासन दिले आहे.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT